राज्य हॉलीबॉलस्पर्धेत पुण्याची विजयी झेप; म्हसोबावाडीच्या मुलींच्या खेळीवर कौतुकाचा वर्षाव

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

जनसंघर्ष न्यूज नेटवर्क

नवी मुंबई, ता.९:- नवी मुंबई महानगरपालिकेच्या सहकार्याने महाराष्ट्र राज्य हॉलीबॉल असोसिएशनतर्फे आयोजित अठरा वर्षाखालील राज्य अजिंक्यपद स्पर्धेला उत्साहपूर्ण प्रतिसाद मिळाला. राज्यातील पुणे, लातूर, अमरावती, कोल्हापूर, मुंबई, नाशिक, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर या आठ विभागांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला. तीन दिवस रंगलेल्या सामन्यांमध्ये मुलींनी दिलेल्या दमदार खेळीने मैदानावर ताणतणावाचे वातावरण निर्माण झाले.

या रोमांचकारी लढतीत पुणे विभागाने उत्तुंग खेळ कौशल्य, उत्तम समन्वय आणि जिद्दीच्या बळावर राज्यातील विजेतेपदावर आपली मोहोर उमटवली. राज्यातील आठ संघांमध्ये पुणे विभागाने सर्व प्रतिस्पर्ध्यांना नमवताना आपले प्राबल्य स्पष्ट दाखवून दिले.

 

विजयी पुणे संघात म्हसोबावाडी गावातील तब्बल सहा मुलींनी चमक दाखवत गावाचा मान उंचावला. समृद्धी चांदगुडे, साक्षी साळुंखे, तन्वी साळुंखे, प्रणाली पवार, श्रावणी चांदगुडे आणि वर्षा काळे या सहा तेजतर्रार खेळाडूंनी या स्पर्धेत भक्कम योगदान दिले. त्यांच्यासोबत सोलापूर जिल्ह्यातील कार्तिकी व वैष्णवी तसेच पुण्यातील अभिश्री, राधा, नव्या, ग्रीष्मा, सई आणि श्रेया या मुलींचा सहभागही संघाला अधिकाधिक मजबूत बनवणारा ठरला.

 

पुणे विभागाच्या विजयानंतर प्रशिक्षकांच्या मेहनतीचेही कौतुक सर्वत्र होत आहे. पवार स्पोर्ट्स अकॅडमीचे कोच किरण पवार, श्रुती मासाळे, आदित्य चांदगुडे आणि अथर्व जगताप यांनी मुलींना सातत्यपूर्ण प्रशिक्षण व मार्गदर्शन दिल्याने विजेतेपदाची वाट सुकर झाली.

 

विजयाचे वृत्त म्हसोबावाडीत पोहोचताच गावात आनंदोत्सवाला सुरुवात झाली. विजयी मुलींची ढोल-ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. गावातील महिला, ग्रामस्थ आणि युवक-युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला. मुलींवर कौतुकाचा वर्षाव करत गावकऱ्यांनी त्यांच्या मेहनतीला दाद दिली.

 

म्हसोबावाडीच्या सहा मुलींनी राज्यस्तरावर दाखवलेल्या या चमकदार खेळीमुळे गावाचा लौकिक वाढला असून स्थानिक क्रीडाक्षेत्रात उत्साह निर्माण झाला आहे. ग्रामीण भागातील मुली महाराष्ट्राच्या पटलावर नाव चमकवू शकतात, याची पुनर्रचना या कामगिरीने केली आहे.

 

ग्रामीण भागातीलहॉलीबॉल मैदानावर  सरावातून सिद्ध केलेली ही कामगिरी पुन्हा एकदा सिद्ध करते—जिद्द आणि शिस्त असेल, तर गावातील मुलीही राज्य पातळीवर इतिहास घडवू शकतात.

Jan Sangharsh News
Author: Jan Sangharsh News

जन संघर्ष न्यूज लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें

error: Content is protected !!