साताऱ्यातील दैवी चमत्कार! एका मातेच्या कुशीत सात देवदूत – जिल्हा रुग्णालयात आनंदसोहळा.!!

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

जनसंघर्ष न्यूज नेटवर्क
आपल्या परिसरातील बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क-७५८८६२२३६३
सातारा, ता.१४ : “देव पोटभर देतो” असं म्हटलं जातं. पण साताऱ्यातील एका साध्या कुटुंबाच्या घरी देवाने अक्षरशः सात देवदूतांची भेट दिली आहे. या चमत्काराने जिल्हा शासकीय रुग्णालयात जणुकाही आनंदाचा सोहळाच रंगला.
कोरेगाव तालुक्यात माहेरी आलेल्या काजल विकास खाकुर्डिया (वय २७) या तरुणीने शुक्रवारी संध्याकाळी सिझेरियन शस्त्रक्रियेद्वारे एकाचवेळी चार बाळांना जन्म दिला. त्यात तीन मुली आणि एका मुलाचा समावेश आहे. आश्चर्याची बाब म्हणजे पाच वर्षांपूर्वीच काजलला तीन जुळी बाळं झाली होती. म्हणजेच एका मातेच्या पोटी आता तब्बल सात बाळं वाढत आहेत.
गुजरातमधील मूळ रहिवासी असलेले विकास खाकुर्डिया सासवड येथे गवंडी म्हणून रोजंदारीवर काम करतात. श्रमाने आणि घामाने कुटुंब चालवणाऱ्या या दाम्पत्याच्या आयुष्यात सात देवदूतांचे आगमन झाल्याने त्यांच्या संघर्षमय जीवनाला गोडीची आणि आनंदाची नवी किनार लाभली आहे.
ही अवघड डिलिव्हरी यशस्वी करण्यासाठी डॉ. देसाई, डॉ. सलमा इनामदार, डॉ. खडतरे, डॉ. झेंडे, डॉ. दिपाली राठोड व त्यांच्या संपूर्ण पथकाने अपार मेहनत घेतली. सुरुवातीला डॉक्टरांनाही धाकधूक होती; मात्र शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडताच नातेवाईक, वैद्यकीय कर्मचारी आणि रुग्णालयात उपस्थित लोकांनी सुटकेचा निश्वास टाकला. आई व सर्व बाळं ठणठणीत आहेत.
जिल्हा रुग्णालयात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि पाहता पाहता एकप्रकारे आनंदसोहळ्याचे वातावरण निर्माण झाले. साताऱ्यात आता चर्चा सुरू आहे – ही घटना गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डलाही टक्कर देणारी ठरू शकते.
एका साध्या गवंड्याच्या घरात सात देवदूतांचे आगमन झाल्याने खाकुर्डिया कुटुंबाच्या आयुष्यात गोड गोंगाटाचा, हास्याचा आणि आनंदाचा नवा पर्व सुरू झाला आहे.
Jan Sangharsh News
Author: Jan Sangharsh News

जन संघर्ष न्यूज लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें

Buzz4 Ai
error: Content is protected !!