सख्खा बाप झाला पक्का सैतान ; स्वतःच्या मुलीवरचं केला लैंगिक अत्याचार.!!

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

जनसंघर्ष न्यूज नेटवर्क

नवी मुंबई :- लेक आणि बापाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना नवी मुंबईत घडली आहे. आपल्या तीन वर्षाच्या पोटच्या मुलीवरच चक्क बापानं लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार नवी मुंबईत घडला आहे . पीडित चिमुरडीवर नराधम बापानं अत्याचार केला असून, सदरची घटना ही पीडित मुलीच्या आईला समजताच तिनं त्या नराधम बापाला या गोष्टीचा जाब विचारला आहे.मात्र, बापानं आईला शिवीगाळ करत मारण्याची धमकी दिली. हा किळसवाणा प्रकार उघडकीस आल्यानंतर, पोलिसांनी नराधम बापाच्या विरोधात पोक्सो कायदयाअंतर्गत गुन्हा दाखल केला असून, त्यामध्ये त्याला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांकडील माहितीनुसार, सदरील धक्कादायक घटना नवी मुंबईच्या घणसोली रोड परीसरात घडलेली असून दि. २६ डिसेंबर रोजी . पीडित तीन वर्षीय चिमूरडी घरात एकटी होती. आरोपी बापानेचं आपल्या पोटच्या मुलीसोबत असे अश्लील आणि लैगिंक चाळे केले आहेत. व त्यानंतर जबरदस्तीनं लैगिंक अत्याचार केला आहे. ही धक्कादायक माहिती मुलीनं आपल्या आईला दिली होती.

त्यानंतर पीडितेच्या आईला ही बाब लक्षात येताच तिला धक्काच बसला. तिनं मुलीला आणखीन विचारपूस केली असता, बाप गेले अनेक दिवसांपासून हे काळं कृत्य करत असल्याचं आता समोर आलं. यानंतर पीडित मुलीच्या आईनं घृणास्पद कृत्याबद्दल बापाला जाब विचारला. मात्र, नराधम बापानं आईला शिवीगाळ करीत ठार मारण्याची धमकी दिली. याच जाचाला त्रासलेल्या महिलेनं तातडीने रबाळे पोलीस ठाण्यात जाऊन त्याच्या विरुद्ध बाल लैंगिक अत्याचाराचा पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. त्यानंतर आरोपी बापाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणी रबाळे पोलिसांकडून घटनेचा सखोल तपास करण्यात येत असून, नराधम बापाला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी आता सामान्य नागरिकांकडून होत आहे.

ताज्या बाताम्या मिळवण्यासाठी आजच आपल्या जनसंघर्ष न्यूजला सबस्क्राइब व लाइक करा.

Jan Sangharsh News
Author: Jan Sangharsh News

जन संघर्ष न्यूज लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें

Buzz Open / Ai Website / Ai Tool