खाकीला फाशीचा कलंक! बाप-लेकाच्या कोठडीतील हत्येप्रकरणी 9 पोलिसांना मृत्यूदंड

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

जनसंघर्ष न्युज नेटवर्क/ बातमीसाठी संपर्क-७५८८६२२३६३

पुणे, ता.७: तामिळनाडूमधील गाजलेल्या बाप-लेकाच्या कोठडीतील मृत्यू प्रकरणात अखेर न्यायालयाने ऐतिहासिक आणि कडक निकाल देत 9 पोलिसांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. खाकी वर्दीचा गैरवापर करून अमानुष अत्याचार करत निष्पापांचा जीव घेणाऱ्या या आरोपींना “दुर्मिळातील दुर्मिळ” गुन्हा ठरवत न्यायालयाने कठोर शब्दांत फटकारले.

मदुराई न्यायालयाने थुथुकुडी जिल्ह्यातील व्यापारी पी. जयराज आणि त्यांचा मुलगा जे. बेनिक्स यांच्या कोठडीतील मृत्यू प्रकरणात हा निकाल दिला. इन्स्पेक्टर श्रीधर, सब-इन्स्पेक्टर बाळकृष्णन, रघू गणेश यांच्यासह इतर सहा पोलिसांना दोषी ठरवण्यात आले आहे.
न्यायालयाने निकाल देताना संताप व्यक्त करत म्हटले की, बाप आणि मुलाला एकमेकांसमोर विवस्त्र करून निर्दयीपणे मारहाण करण्यात आली. हा प्रकार केवळ क्रूरतेचा कळस नसून मानवतेलाच काळिमा फासणारा आहे. सरकारी सेवेत असलेल्या अधिकाऱ्यांनी कामाच्या ताणाचा बहाणा करून असा अमानुष छळ करणे अजिबात सहन केले जाणार नाही, असेही कोर्टाने ठणकावले.

ही धक्कादायक घटना 19 जून 2020 रोजी लॉकडाऊनदरम्यान घडली होती. दुकान वेळेपेक्षा जास्त वेळ उघडे ठेवल्याचा आरोप करत जयराज आणि बेनिक्स यांना साथनकुलम पोलीस ठाण्यात नेण्यात आले. तेथे रात्रभर लाठ्या आणि शस्त्रांनी बेदम मारहाण करण्यात आली. या अमानुष छळामुळे काही दिवसांतच दोघांचाही मृत्यू झाला.

या प्रकरणाने संपूर्ण देश हादरला होता. प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन सीबीआयकडे तपास सोपवण्यात आला. तपासात 100 हून अधिक साक्षीदारांची नोंद घेण्यात आली. एका महिला कॉन्स्टेबलच्या साक्षीने या प्रकरणाला निर्णायक वळण मिळाले. अखेर पाच वर्षांच्या न्यायलढ्यानंतर पीडित कुटुंबाला न्याय मिळाला आहे.

Jan Sangharsh News
Author: Jan Sangharsh News

जन संघर्ष न्यूज लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें

Buzz Open / Ai Website / Ai Tool
error: Content is protected !!