राज्यस्तरावर प्रज्वलचा जलवा; अचूक नेमबाजीने पटकावले दुहेरी सुवर्ण

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

जनसंघर्ष न्युज नेटवर्क
सोलापूर, ता.१७ : महाराष्ट्र आर्चरी असोसिएशन व सोलापूर जिल्हा आर्चरी असोसिएशन यांच्या वतीने नेहरुनगर क्रीडा संकुल येथे १२ ते १५ मार्च २०२६ दरम्यान राज्यस्तरीय १० व १३ वर्षांखालील धनुर्विद्या स्पर्धा उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेत पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील म्हसोबाचीवाडी येथील प्रज्वल धनंजय दाभाडे याने उल्लेखनीय कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधले.
१० वर्षांखालील गटात कंम्पाउंड प्रकारात सहभागी झालेल्या प्रज्वलने वैयक्तिक फेरीत तब्बल ३६० पैकी ३५५ गुणांची कमाई करत संपूर्ण राज्यात अव्वल स्थान पटकावले. अचूक नेमबाजी आणि सातत्यपूर्ण प्रदर्शनाच्या जोरावर त्याने सुवर्णपदकावर नाव कोरले. विशेष म्हणजे, स्पर्धेतील प्रत्येक फेरीत त्याने उच्च दर्जाची कामगिरी करत प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकले.
याशिवाय, सांघिक प्रकारातही प्रज्वलने पुणे जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करत संघाला सुवर्णपदक मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली. त्याच्या या दुहेरी यशामुळे इंदापूर तालुक्यासह पुणे जिल्ह्यातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. प्रज्वलच्या या उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर त्याची या महिन्याच्या अखेरीस आंध्रप्रदेशमधील गुंटूर येथे होणाऱ्या राष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेसाठी निवड झाली आहे. ग्रामीण भागातून पुढे येत राज्य पातळीवर झळकलेल्या या यशामुळे इतर खेळाडूंनाही प्रेरणा मिळणार असल्याचे मत क्रीडा क्षेत्रातून व्यक्त होत आहे.
प्रज्वलच्या यशामागे त्याचे कष्ट, प्रशिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचे पाठबळ महत्त्वाचे ठरले असून, आगामी राष्ट्रीय स्पर्धेतही तो अशीच चमकदार कामगिरी करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Jan Sangharsh News
Author: Jan Sangharsh News

जन संघर्ष न्यूज लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें

error: Content is protected !!