जनसंघर्ष न्युजच्या पाठपुराव्याचा ठसा; दोन वर्षे रखडलेले शेटफळगडे–लासुर्णे रस्त्याचे काम अखेर मार्गी

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

जनसंघर्ष न्युज नेटवर्क

इंदापूर, ता.५ :- इंदापूर तालुक्यातील शेटफळगडे–म्हसोबाचीवाडी–लाकडी–काझड बोरी–लासुर्णे या मुख्य ग्रामीण रस्त्याचे काम अखेर गतीमान झाले आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत दोन वर्षांपूर्वी सुरू झालेल्या या रस्त्याच्या कामाला म्हसोबावाडी गावठाणातील लक्ष्मीमाता मंदिर ते चांदगुडे वस्ती या महत्त्वाच्या भागात तांत्रिक अडथळे आणि काही स्थानिक अडचणींमुळे दीर्घकाळ स्थगिती आली होती.

रस्त्याची दयनीय स्थिती आणि कामातील होणाऱ्या विलंबाबाबत जनसंघर्ष न्युजने गेल्या काही महिन्यांत सातत्याने बातम्या प्रसिद्ध करत पाठपुरावा केला. त्यानंतर संबंधित प्रकरणाची दखल घेऊन PWD चे अधिकारी मधुकरराव सुर्वे यांनी तातडीने हालचाल केली. सुर्वे यांनी संबंधित कॉन्ट्रॅक्टर तपाडिया यांना त्वरीत सूचना देत अडथळ्यांचा प्रश्न निकाली काढून रस्त्याचे काम तात्काळ सुरू करण्याचे आदेश दिले.

 

अधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपानंतर पुन्हा एकदा कामाला सुरुवात झाली असून स्थानिक ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. दोन वर्षांपासून रखडलेला महत्त्वाचा रस्ता मार्गी लागल्याने शेती, शिक्षण, आरोग्य आणि रोजच्या वाहतुकीसाठी मोठा दिलासा मिळणार आहे.

 

जनसंघर्ष न्युजच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळेच हा प्रश्न मार्गी लागल्याची भावना येथील नागरिकांनी व्यक्त केली असून प्रशासनाने दाखवलेली तत्परता कौतुकास्पद ठरत आहे.

 

Jan Sangharsh News
Author: Jan Sangharsh News

जन संघर्ष न्यूज लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें

Buzz Open / Ai Website / Ai Tool
error: Content is protected !!