जनसंघर्ष न्युज नेटवर्क/ बातमीसाठी संपर्क -७५८८६२२३६३
नाशिक, ता.१८ :- चार महिने गजाआड ठेवून जवानावर अन्याय करणाऱ्या ‘सिस्टम’चा न्यायालयाकडून पर्दाफाश.
चंदू चव्हाण प्रकरणात न्यायालयाचा निर्णय म्हणजे सरळ-सरळ ‘व्यवस्थेला’ दिलेली कानशिलात!
देशासाठी जान देणाऱ्या सैनिकाला आपल्या घरच्या मातीतच न्यायासाठी भटकावणारी ही कोणती विकृत व्यवस्था?
देशाच्या सीमारेषेवर छातीशी गोळ्या झेलणारा जवान… आणि त्यालाच आपल्या देशात अन्यायग्रस्त बनवणारी अकार्यक्षम ‘सिस्टम’!
बडतर्फ जवान चंदू चव्हाण यांना चार महिन्यांपासून नाहक तुरुंगात ठेवणारी यंत्रणा आज न्यायालयाच्या एका निर्णयाने पूर्णपणे उघडी पडली आहे.
न्यायालयाने चंदू चव्हाण यांना जामीन मंजूर करताच, या अन्यायाच्या कारवाया करणाऱ्या “सिस्टम”ला हा थेट कानशिलात ठरला!
जवानावर लादलेले आरोप कोसळले.
तपासातील उघड्या-नागड्या त्रुटी समोर आल्या.
आणि न्यायालयाने स्पष्ट सांगितले—
“या जवानावर अन्याय झाला आहे!”
यापेक्षा मोठं ‘सिस्टम फेल्युअर’ इतर कोणतं असणार?
देशासाठी प्राण देणाऱ्या जवानाची अशी फजिती करणाऱ्या अधिकाऱ्यांना जनता स्पष्ट प्रश्न विचारते—
“ही व्यवस्था कोणासाठी चालते? अन्याय करणाऱ्यांसाठी की देशरक्षकांना शिक्षा देण्यासाठी?”
या विकृत, बेफिकीर यंत्रणेच्या तोंडावर चुना लावला तो भूमिपुत्र फाउंडेशनचे विनोद नाठे आणि माजी न्यायाधीश ॲड. प्रकाश ताजनपुरे यांनी.
प्रकरण समजताच नाठे यांनी ताजनपुरे यांची भेट घेतली, आणि ती भेट इतिहासात नोंदली जाणारी ठरली.
माजी न्यायमुर्ती ताजनपुरे साहेबांचा शब्द आजही जनतेच्या अंगावर काटा आणतो—
“या जवानावर अन्याय होत आहे! मी एक रुपया फी न घेता त्याला न्याय मिळवणार!”
न्यायलढाईची ही शपथ आज फलद्रूप झाली.
न्यायालयात ॲड. प्रतीक ताजनपुरे यांनी अशी स्फोटक बाजू मांडली की सिस्टमच्या चुका स्वतःच उघड झाल्या.
तथ्यांचा मारा, निडर मांडणी आणि न्यायालयातील ठाम भूमिका—
यामुळेच न्यायालयाला जामीन मंजूर करण्याखेरीज पर्यायच राहिला नाही.
हा निर्णय फक्त एका जवानाचा विजय नाही…
हा सिस्टमच्या पोटात आग लावणारा, अन्याय करणाऱ्यांच्या गळ्यात फास टाकणारा आणि विकृत व्यवस्थेला आरसा दाखवणारा न्यायाचा विजय आहे!
आजचा दिवस देशासाठी लढणाऱ्या सर्व सैनिकांसाठी संदेश देऊन गेला—
“अन्याय करणाऱ्यांची सिस्टम कितीही ताकदवान असली तरी न्याय, सत्य आणि लढणारे लोक अजूनही जिवंत आहेत!”
जवान चंदू चव्हाण यांच्या सुटकेचा हा क्षण—
अभिमानाचा, आक्रोशातून उभा राहिलेला आणि ‘सिस्टम’च्या अंगावर काटा आणणारा आहे.
आणि हो…
यंत्रणेने आता सावध रहावं—
जवानांवर अन्याय करणाऱ्यांची लायकी आता जनता उघडी पाडायला अजिबात मागे पुढे पाहणार नाही !
Author: Jan Sangharsh News
जन संघर्ष न्यूज लाईव्ह
Post Views: 15,380










