Search
Close this search box.

मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण, सोडवणेबाबतचं निवेदन; पुणे जिल्हा मराठा समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना सादर…

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें


 जनसंघर्ष न्यूज प्रतिनिधी

पुणे, मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटलांचे उपोषण सरकारने पुढाकार घेऊन त्वरित सोडवणे बाबतचे निवेदन अखंड मराठा समाज पुणे जिल्हयाच्या वतीने दि.२० सष्टेंबर रोजी पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांचेकडे देण्यात आले आहे.

निवेदनामध्ये पुढील प्रमाणे म्हटले आहे, की अखंड मराठा समाजाच्या वतीने आपणास विनंती करत आहोत की, गरजवंत मराठ्यांच्या 50%च्या आतून OBC प्रवर्गातून आरक्षणासाठी संघर्षयोद्धा मनोज दादा जरांगे पाटील गेल्या एक वर्षभरापासून आंदोलन करत आहेत. तसेच आता पर्यंत मनोज दादा जरांगे पाटलांनी सहा वेळा आमरण उपोषण सुद्धा यापुर्वी केले आहे. मनोज दादा जरांगे पाटील यांची खालावत चाललेली परिस्थिती पाहता व त्यांच्या आरोग्याचा विचार करता त्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. तसेच आपण अखंड मराठा समाजाची परीक्षा न पाहता आपण स्वतः पुढाकार घेऊन खालील मागण्या त्वरित मान्य कराव्यात.
1)सगेसोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करावी. 2)हैदराबाद गॅझेट लागू करावे, सातारा गॅझेट लागू करावे. बॉम्बे गव्हर्मेंट गॅझेट लागू करावे.
3)संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा बांधवांवर झालेले गुन्हे सरसकट मागे घेण्यात यावेत.
4)कुणबी नोंदीच्या आधारे प्रमाणपत्र द्यावे.
5) शिंदे समितीने नोंदी शोधण्याचे काम गतीने सुरु करावे.
6) EWS सह SEBC किंवा कुणबी OBC हा पर्याय तात्काळ अंमलात आणावा.
7)मराठा आणि कुणबी एकच असल्याचा अध्यादेश शासनाने काढावा.
मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी सरकार म्हणून विषेस पुढाकार घ्यावा तसेच विशेष अधिवेशन बोलवून मराठा समाजाच्या मागण्या मान्य कराव्यात.विशेष अधिवेशन लाईव्ह करण्यात यावे जेणेकरून विरोधी पक्षांची भूमिका अखंड मराठा समाजाला कळेल, आणि मराठा आरक्षणाच्या विषयाचे राजकारण कोण करत आहे हे संपूर्ण महाराष्ट्राला कळेल,आपण वरील विषय मार्गी लावले तर अखंड मराठा समाज तुमचे ऋण कधीही विसरणार नाही.
विरोधकांपेक्षा सत्तेवर आल्यावर तुम्ही मराठा समाजासाठी सारथी, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ यासारखे विविध संस्थाच्या माध्यमातून मराठा समाजाचा विकास घडून येण्यासाठी प्रयत्न केला आहे. आज रोजी अखंड मराठा समाजाला न्यायालयीन कक्षेत टिकणारे आरक्षण मिळणे खूप गरजेचे आहे. आपल्या तिन्ही पक्षांनी पुढाकार घेतला तर हे टिकणारे 50% च्या आतून OBC प्रवर्गातून आरक्षण मराठा समाजाला मिळू शकते. संघर्षयोद्धा मनोज दादा जरांगे पाटील उपोषणाला बसून तीन दिवस झाले तरी सरकारने काहीही हालचाली सुरु केलेल्या दिसून येत नाहीत. तरी शासन म्हणून आपण त्वरित विशेष अधिवेशन बोलावे . त्यांच्या तब्बेतीचा विचार करता त्यांना उपोषणापासून फक्त सरकार मागण्या मान्य करून थांबवू शकते. अखंड मराठा समाज पुणे जिल्हा आपणांस कळकळीची विनंती करत आहे की मागण्या आणि आरक्षण देऊन आपण हा प्रश्न कायमस्वरूपीचा निकालात काढण्यात यावा.
अन्यथा राष्ट्रीय महामार्ग रोको,रेल्वे रोको ,सत्तेतल्या आणि विरोधी पक्षातील सरसकट नेत्यांना गाव बंदी,नेत्यांना घेराव, शासकीय कार्यालयातील काम बंद आंदोलन,मराठा समाजातील मुले शाळा, कॉलेज वरती बहिष्कार टाकतील, तसेच मंत्रालयावर घंटा नाद पायी यात्रा काढण्यात येणार आहे तसेच जोपर्यंत आरक्षणाची दखल घेण्यात येत नाही तोपर्यंत मंत्रालयाला घेराव आणि कामबंद आंदोलन करण्यात येईल असा इशारा अखंड मराठा समाज पुणे जिल्हा यांच्यावतीने यावेळी देण्यात आला आहे.
Jan Sangharsh News
Author: Jan Sangharsh News

जन संघर्ष न्यूज लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें

  • Buzz4 Ai
  • Buzz Open / Ai Website / Ai Tool
error: Content is protected !!