बारामती प्रतिनिधी
बारामती,पुण्यामध्ये दिवसागणिक महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसून येत आहे, सदरील घटना पुण्यामध्ये घडली असून त्या दोन अल्पवयीन मुलींना दारू पाजून त्यांच्यावर सामूहिक अत्याचार केल्याची खळबळ उडवून देणारी घटना घडलेली आहे.पोलीसांकडून मिळालेल्या माहिती नुसार, या दोन अल्पवयीन मुली बारामती येथील असून त्या 2 वेगवेगळ्या शाळांमध्ये नववीत शिकत आहेत या दोघींनी घरच्यांना कोणतीही पुर्वकल्पना न देता अचानक एसटी बसने पुण्याला गेल्या होत्या. त्या 14 सप्टेंबर रोजी दोघी बेपत्ता असल्याची तक्रार बारामती तालुका पोलीस स्टेशनला नोंद केली होती. दुसरीकडे या दोघींनी पुण्यात पोहचताच आरोपी ज्ञानेश्वर आटोळे याच्याशी संपर्क साधला होता.
त्याने तात्काळ या दोघींना हडपसर परिसरातील असलेल्या एका रूमवर बोलावले होते. अजून एक आरोपी बारामती येथून हडपसरला पोहोचला होता. तसेच ज्ञानेश्वरने इतर दोन मित्रांना सदरील दोन मुली रूमवर येत असल्याचं सांगितले होते. त्यानंतर हडपसर येथील एका मित्राच्या रूमवर या मुलींना नेहले त्यानंतर रात्री त्यांना दारू पाजण्यात आली होती . दारूच्या नशेत सदरील 4 आरोपींनी या दोनही मुलींवर आळी पाळीने लैंगिक अत्याचार केले होते. सदरील मुली शुद्धीवर आल्या नंतर यामधील एका मुलीने हडपसर येथील एका प्रवाशाच्या मोबाईल वरून आपल्या आईला फोन करून आपल्या बरोबर घडलेल्या घटनेची माहिती दिली. त्यानंतर तिच्या आईने तात्काळ बारामती पोलीस स्टेशनला जाऊन घडलेल्या घटनेची माहिती पोलिसांना दिली होती.या प्रकरणामध्ये ज्ञानेश्वर भरत आटोळे वय 27, राहणार. सावळ, अनिकेत प्रमोद बेंगारे वय 20, राहणार बयाजीनगर, रुई, बारामती व यश उर्फ सोन्या शिवाजी आटोळे वय 21, राहणार सावळ, तालुका बारामती या 3 आरोपींना पोलिसांनी अटक केली असून चौथा आरोपी मात्र फरार आहे.त्याचा देखील पोलीसांकडून शोध सुरू आहे.
त्यानंतर तातडीने बारामती पोलीसांचे महिला कर्मचाऱ्यांचे एक पथक हडपसर कडे तातडीने रवाना झाल्यानंतर. तात्काळ दोन्ही मुलींना त्यांनी आपल्या ताब्यात घेऊन बारामती ग्रामीण पोलीस ठाण्यात आणण्यात आले. त्यानंतर मुख्य आरोपी आसनारा ज्ञानेश्वर आटोळे याला पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे. तसेच इतर आरोपींचा शोध घेऊन आणखी दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले परंतू त्यातील एक आरोपी मात्र फरार आहे, अशी माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी डाॅक्टर सुदर्शन राठोड यांनी माध्यमांना दिली आहे.

Author: Jan Sangharsh News
जन संघर्ष न्यूज लाईव्ह
Post Views: 190