जनसंघर्ष न्यूज नेटवर्क
बारामती, ता.१५: जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कऱ्हावागज येथील विद्यार्थिनी पूर्वा नितीन मंडलिक हिने शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत शाळेच्या नावलौकिकात भर घातली आहे. इयत्ता चौथी पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत सन २०२६ मध्ये पात्र ठरल्याबद्दल तिचा गौरवचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. या यशाबद्दल शाळा व परिसरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
पूर्वाने अभ्यासात सातत्य ठेवत शिष्यवृत्ती परीक्षेत मिळविलेले यश हे तिच्या मेहनतीचे आणि जिद्दीचे फलित असल्याचे मानले जात आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता आणि स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करण्याची क्षमता मोठी असून, योग्य मार्गदर्शन व सातत्यपूर्ण सराव मिळाल्यास तेही उल्लेखनीय यश संपादन करू शकतात, हे या कामगिरीतून अधोरेखित झाले आहे.
याशिवाय ‘मंथन’तर्फे आयोजित सामान्य ज्ञान परीक्षेच्या केंद्रस्तरीय पातळीवर गटविजेतेपद मिळवून पूर्वाने आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. या दुहेरी यशामुळे शाळेतील शिक्षक, पालक व ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पूर्वाच्या या यशामागे तिची मेहनत, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचे प्रोत्साहन महत्त्वाचे ठरले. तिच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शिक्षक व ग्रामस्थांनी शुभेच्छा व्यक्त केल्या असून, भविष्यातही ती विविध स्पर्धात्मक परीक्षांमध्ये चमकदार कामगिरी करेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.
Author: Jan Sangharsh News
जन संघर्ष न्यूज लाईव्ह









