जनसंघर्ष न्यूज नेटवर्क
पुणे, ता.१७ – मराठा समाजावर वारंवार “बाया नाचवल्या, जमिनी उधळल्या” असे आरोप केले जातात. मात्र, १९०९ सालच्या शासकीय नोंदींचा अभ्यास केला असता समाजाची वस्तुस्थिती किती बिकट होती हे स्पष्ट होते. जुन्नर तालुक्यातील ढोलवड गावातील त्या काळातील कागदपत्रांनुसार अनेक मराठा मुलांना फक्त फी भरता न आल्यामुळे शाळा सोडावी लागली होती. मग प्रश्न असा उभा राहतो की, गरीबीत कुटुंबं जगत असताना कोण खरंच बाया नाचवत होतं? कोण जमिनी उधळत होतं?

जमिनींचा इतिहासही काही वेगळा नाही. काही घराण्यांकडे शेकडो एकर शेती असली तरी काँग्रेस सरकारच्या जमिन सीलिंग कायद्यामुळे ती सरकारकडे गेली. वारसाहक्काने जमिनी तुकड्यात विभागल्या गेल्या आणि हजारो कुटुंबं शेतीविना उभी राहिली. उत्पन्न नाही, आधार नाही, त्यामुळे आरक्षणाची मागणी स्वाभाविक ठरते. आरक्षण हा कोणाचाही कायमस्वरूपी हक्क नसून मागे राहिलेल्यांना दिलेला आधार आहे, हे या नोंदी अधोरेखित करतात.
आज मराठा समाजाकडे कारखाने, संस्थानं, नेते आहेत असं म्हटलं जातं; पण जर त्याचा लाभ समाजातील खालच्या घटकांपर्यंत पोहोचला असता तर परिस्थिती वेगळी दिसली असती. इतिहास लपवता येत नाही; कागदपत्रं आणि पुरावे समाजाची खरी कहाणी सांगतात.
Author: Jan Sangharsh News
जन संघर्ष न्यूज लाईव्ह
Post Views: 260










