दौंड तालुक्यात सामूहिक अत्याचाराची संतापजनक घटना; ऊसाच्या शेतात महिलेस जबरदस्तीने नेऊन अत्याचार.!!

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

दौंड, जनसंघर्ष न्यूज नेटवर्क – माळेवाडी (ता. दौंड) येथील ग्रामपंचायत हद्दीत सोमवारी रात्री उशिरा एक धक्कादायक घटना घडली आहे. लघुशंकेसाठी घराबाहेर गेलेल्या एका महिलेस जबरदस्तीने उसाच्या शेतात नेऊन सामूहिक अत्याचार करण्यात आल्याचा प्रकार समोर आला असून, या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला सध्या आपल्या वडिलांच्या घरी माळेवाडी, लिंगाळी येथे वास्तव्यास होती. रात्री आठच्या सुमारास ती लघुशंकेसाठी घराच्या मागील बाजूस गेली असता, आरोपी राजू काळे, संदीप काळे, सुरज पवार, निलेश चव्हाण आणि जितेंद्र चव्हाण हे पाच जण त्या ठिकाणी आले. यावेळी राजू काळे याने पीडितेला जबरदस्तीने उचलून ऊसाच्या शेतात नेले.
तेथे आरोपींनी पीडितेला “तू आमच्या घरी पोलीस का पाठवलेस?” असे म्हणत दमदाटी केली. पीडितेने हा आरोप नाकारला असतानाही, राजू काळे आणि निलेश चव्हाण यांनी तिचे कपडे जबरदस्तीने काढले व संदीप काळे, जितेंद्र चव्हाण आणि सुरज पवार यांनी तिला धरून ठेवले. यानंतर राजू काळे आणि निलेश चव्हाण यांनी तिच्यावर सामूहिक अत्याचार केला.
घटनेनंतर आरोपींनी पीडितेला धमकावून तेथून पळ काढला. या प्रकरणी पीडित महिलेने दौंड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, गु. र. नं. 502/2025, भारतीय दंड विधान कलम 70(1), 352 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
या अमानुष घटनेमुळे माळेवाडी परिसरात खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. आरोपींवर कठोर कारवाई व्हावी, अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे.
Jan Sangharsh News
Author: Jan Sangharsh News

जन संघर्ष न्यूज लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें