अतिट गावच्या सुपुत्राचा, विश्वकर्मा पुरस्काराने राज्यपालांच्या हस्ते सन्मान…

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

जनसंघर्ष न्यूज नेटवर्क
अतिट गावचे सुपुत्र प्रवीण बबन जाधव यांचा विश्वकर्मा राज्य गुणवंत पुरस्काराने राज्यपालांच्या हस्ते सन्मान…
खंडाळाः- कामगार विश्वात प्रतिष्ठेच्या असलेल्या महाराष्ट्र शासनाच्या विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्काराने श्री प्रवीण बबन जाधव यांचा सन्मान करण्यात आला.
राज्याचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन कामगार मंत्री आकाश फुंडकर, कामगार राज्यमंत्री ऍडव्होकेट आशिष जयस्वाल, महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ आयुक्त रविराज इळवे, आमदार मनीषा कायंदे यांच्या हस्ते प्रवीण जाधव यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. 25 हजार रुपये रोख, स्मृतीचिन्ह आणि मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते.
प्रवीण जाधव हे १९९८ पासून गोदरेज अँड बॉईज कंपनीमध्ये कार्यरत आहेत तसेच ते खंडाळा तालुक्यातील अतिट गावचे सुपुत्र आहेत अतिट या स्वतःच्या गावी तसेच परिसरातील इतर गावात सी एस आर फंडातून निधी उपलब्ध करून देण्यासाठी मदत करीत असतात. सी एस आर फंडातून जिल्हा परिषद शाळेत वॉटर प्युरिफायर, कवठे गावासाठी सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प, मिरजे गावात आधुनिक भात लावणी यंत्र मिळवून देण्यासाठी त्यांनी सहकार्य केले आहे. महाराष्ट्र हरित सेनेचे सभासद असून, गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, अनाथ आश्रमात मदत, अन्नदान, आदि सामाजिक कार्यक्रमात सतत सहभागी असतात लॉकिंम कामगार संघटना व लॉकिम कर्मचारी को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी स्थापनेसाठी त्यांचे योगदान आहे.
प्रवीण जाधव यांना विश्वकर्मा कामगार पुरस्कार प्राप्त झाल्याने त्यांचे कंपनीतील सहकारी, अधिकारी तसेच अतिट गावचे सरपंच, उपसरपंच आणि सर्व सदस्य तसेच अतिट विकास सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन आणि सर्व संचालक मंडळ सर्व ग्रामस्थ मंडळ यांनी अभिनंदन केले आहे.
Jan Sangharsh News
Author: Jan Sangharsh News

जन संघर्ष न्यूज लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें