इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांवर सततचा अन्याय का ? खडकवासला धरणातून सोडण्यात आलेले पाणी केले बंद…

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

जनसंघर्ष न्यूज नेटवर्क
इंदापूरः- इंदापूर तालुक्यातील शेतकरी राजाची जीवनदायी म्हणून ओळख आसणारे शेतीसाठीचे पाणी अचानक बंद करण्यात आल्यामुळे इंदापूर तालुक्याच्या शेकडो हेक्टर शेत पिकांना करपण्याचा धोका निर्माण झाला आहे. इंदापूर तालुक्यातील शेतकरी आज पाण्याविना होरपळत असल्याचे सध्याचे चित्र पहायला मिळत आहे एकीकडे हवेली बारामती दौंड या तालुक्यांतील पिकांना मुबलक प्रमाणात पाणी दिले जाते, पण इंदापुरला मात्र दरवेळेस वाऱ्यावर सोडले जाते असे का ? असा संतप्त सवाल आता या भागातील शेतकऱ्यांकडून उपस्थित होऊ लागला आहे. या तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा माध्यमांसमोर मांडताना म्हणाले आहेत की,आम्ही पण माणस आहोत आम्ही पण कष्टाने शेती करत आहोत मग इंदापुरच्याच वाट्याला पाणी वाटपाबाबतचा अन्याय सतत का केला जातो? असा संतप्त सवाल यावेळी उपस्थित केला आहे.
दौंड तालुक्यातील उसाच्या पिकाचे गोड फायदे घेणारे शेतकरी पाहिले, की इंदापूरमधील जळालेल्या पिकांवरती नजर टाकली तरी मनाला प्रचंड वेदना होतात. कांद्याच्या पातीसारखी आसणारी हिरवीगार पिकं शेजारच्या तालुक्यात, मात्र करपलेली पिकं, आणि रखरखीत माती आमच्या तालुक्यात हे चित्र कधी तरी बदलणार आहे का? हे केवळ निसर्गाचं नव्हे, तर व्यवस्थेचं सुध्दा अपयशच आहे. असा थेट आरोपच येथील शेतकरी राजाकडून केला जात आहे
या सर्व परिस्थितीला इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांची भूमिका अत्यंत निराशाजनक ठरली आहे.निवडणुकांआधी आश्वासनांची खैरात करणारे आमदार आता या गंभीर पाणी प्रश्नावर मौन बाळगून आहेत का ? शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकूनही दुर्लक्ष करणं, ही लोकप्रतिनिधींची लाजीरवाणी तर भूमिका नाही ना ? 
असा थेट आरोप येथील शेतकऱ्यांकडून केला जातोय. इंदापूर तालुक्याला दरवेळी पाण्यापासून वंचित ठेवण्यामागे जर कोणतीही राजकीय भूमिका असेल, तर ती अत्यंत घातक प्रवृत्ती असून, त्याला शेतकऱ्यांनी आता जाब विचारण्याची वेळ आली आहे. यापुढे आता शांतपणे सहन करणं थांबवून संघर्षाची तयारी करावी लागेल. असा इशाराही शेतकऱ्यांनी यावेळी दिला आहे. याबाबत खडकवासला कालवा पाणी वितरण व्यवस्थेचे कार्यकारी अभियंता यांच्याशी संपर्क केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही .
Jan Sangharsh News
Author: Jan Sangharsh News

जन संघर्ष न्यूज लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें

Buzz4 Ai