जनसंघर्ष न्यूज नेटवर्क
बारामती :- रुग्णसेवा हीच खरी ईश्वरसेवा याचा प्रत्यय खरोखर बारामतीत आला आहे. माणुसकी अजुनही जीवंत आहे त्याचे झाले असे की, दिनांक १७ मे रोजी महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे , श्रीकांत फाउंडेशनचे अध्यक्ष व विद्यमान खासदार डॉ श्रीकांत शिंदे , मुख्यमंत्री कार्यालयाचे विशेष कार्यकारी अधिकारी ओएसडी श्री मंगेशजी चिवटे , शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य श्री राम हरी राऊत आणि माळेगाव कारखान्याचे विद्यमान संचालक ॲड.श्री गुलाबराव बाजीराव गावडे पाटील (अण्णा) व शिवसेना पुणे जिल्हा युवा कार्याध्यक्ष श्री वस्ताद पप्पू माने यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करत असलेले सतिश गावडे यांच्या तात्काळ केलेल्या मदतीमुळे श्री. बिभीषण विठ्ठल पवार तालुका बारामती जिल्हा पुणे (वय ६५ वर्ष ) या व्यक्तीचे प्राण वाचले आहेत. बिभीषण पवार यांचा अचानक धाप लागून बीपी लो झाला त्यामध्ये तो बेशुद्ध अवस्थेमध्ये जागेवरती चक्कर येऊन कॉटवरून खाली पडले त्यामुळे पेशंटच्या नातेवाईकांनी पेशंटची छाती दाबून प्रयत्न केले व त्याला पेशंटने काहीच प्रतिसाद न दिल्यामुळे पेशंटचे नातेवाईक घाबरून गेले बराच वेळ गेला काही वेळानंतर पेशंटच्या नातेवाईकांकडून अंतिम विधी करण्याचा विचार आला.
परंतु तेवढ्यात पेशंटचे जावई आसणारे युवा कीर्तनकार ह भ प श्री सुशांत महाराज साळुंखे यांनी.बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे पुणे जिल्हा समन्वयक तथा सामाजिक कार्यकर्ता श्री सतीश गावडे संपर्क कार्यालय रचना मार्केट मारवाड पेठ यांना 9850020274 या मोबाईलवरून संपर्क केला असता त्यांनी ताबडतोब त्या पेशंटच्या घरी ॲम्बुलन्स नेहून पेशंटला ट्रेचरवरून ॲम्बुलन्समध्ये टाकून बारामतीतील तज्ञ एमडी डॉ श्री.स्वप्निल खोमणे यांच्या खोमणे हॉस्पिटल पंचायत समिती बारामती शेजारील हॉस्पिटलमध्ये दाखल केले .
लागलीच डॉक्टरांनी त्या पेशंटला अतिदक्षता विभागात ऑक्सिजन व व्हेंटिलेटर चालू केले असता व तात्काळ ब्लडची चाचणी केली असता एक टक्का ब्लड व ब्लड शुगर एकदम लो प्रमाणात आढळून आलं त्यामध्ये खोमणे हॉस्पिटलचे तज्ञ डॉक्टर खोमणे यांनी पेशंट वरती अतिशय उत्कृष्टपणे उपचार सुरू ठेवले चार दिवसानंतर पेशंटचे ब्लड ९ पॉइंट पर्यंत आले व आताच्या परिस्थितीमध्ये पेशंटची परिस्थिती सुधारू लागली त्यामुळे पेशंटच्या नातेवाईकांनी वरील मान्यवरांचे विशेष म्हणजे जे देवा सारखे त्या पेशंट वरती अहोरात्र उपचार केले ते.खोमणे हॉस्पिटलचे मेन इन्चार्ज डॉ श्री स्वप्निल खोमणे व तेथील सर्व स्टाफचे आणि वेळेत व तात्काळ पेशंटला विना मोबदला मदत केलेले सामाजिक कार्यकर्ते सतीश गावडे यांचे पेशंटच्या नातेवाईकांकडून आभार व्यक्त करण्यात आले आहेत.

Author: Jan Sangharsh News
जन संघर्ष न्यूज लाईव्ह
Post Views: 129