भारताचा पुन्हा एकदा सर्जिकल अटॅक ; पाकिस्तानच्या १२ शहरांवर ५० ड्रोनद्वारे हल्ले…

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

जनसंघर्ष न्यूज नेटवर्क
पुणेः- भारताकडून पाकिस्तानवर पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राइक करण्यात आला आहे यामध्ये ऑपरेशन सिंधूरचा दुसरा पार्ट करण्यात आला आहे. भारताकडून पाकिस्तानवर सर्वात मोठी कारवाई केली आहे. ऑपरेशन सिंदूर नंतर भारताने आता पाकिस्तानातील महत्वाच्या शहरांवर अत्याधुनिक ड्रोनने हल्ले करण्यात आले आहेत.
पाकिस्तानच्या १२ शहरांवर ५० ड्रोनच्या द्वारे हे हल्ले करण्यात आले आहेत. पाकिस्तानकडून भारताच्या लष्करी तळांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याने. तो प्रयत्न भारताकडून हाणून पडण्यात आला. या विषयी भारत सरकारने अधिकृतपणे एक पत्रक काढून ड्रोन हल्ला आणि पाकिस्तानची हवाई संरक्षण प्रणालीच नष्ट केली असल्याचे म्हटले आहे.
पाकिस्तानकडून भारताच्या नियंत्रण रेषेवर वारंवार गोळीबार सुरु करण्यात आला होता. तसेच भारतातील प्रमुख शहरांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोनच्याद्वारे हल्ला करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न होता. त्यामुळेच भारताकडून पाकिस्तानला चांगला धडा शिकवण्याचा निर्णय घेण्यात आला. भारताच्या एस ४०० या हवाई संरक्षण प्रणालीद्वारे पाकिस्तानची क्षेपणास्त्र नष्ट करण्यात आली आहेत व त्याचे अवशेष हे सीमा भागात दिसून येत आहेत. भारताकडून पहिल्यांदाच एस ४०० या हवाई प्रणालीचा वापर करण्यात आला आहे. रशियाकडून विकसित केलेली ही प्रणाली आहे. भारताने ती रशियाकडून खरेदी केली आहेत. त्यामुळे भारताची ताकत मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे.
भारताच्या सशस्त्र दलांकडून पाकिस्तानातील बहुतांस ठिकाणी हवाई संरक्षण रडार आणि प्रणालींना लक्ष्य करण्यात आले. यामध्ये लाहोर येथील हवाई संरक्षण प्रणाली निष्क्रिय करण्यात आली आहे. ड्रोन हल्ल्यांमध्ये पाकिस्तानी लष्कराच्या HQ-9 क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली युनिटसचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. लाहोर शहराव्यतिरिक्त, गुजरांवाला, रावळपिंडी, चकवाल, बहावलपूर, मियांवाली, कराची, चोर, मियांओ आणि अट्टॉक येथे सुद्धा असे ड्रोन हल्ले भारताकडून करण्यात आले आहेत.
भारत सरकारच्या वतीने एक अधिकृत निवेदन जारी करण्यात आले आहे. आज सकाळी भारताच्या सशस्त्र दलांनी पाकिस्तानमधील बहुतांस ठिकाणी हवाई संरक्षण रडार आणि प्रणालींना लक्ष्य करण्यात आले. भारतानेही पाकिस्तानला त्याच पद्धतीने प्रत्युत्तर दिले आहे. लाहोरमधील एक हवाई संरक्षण प्रणाली सुद्धा नष्ट करण्यात आली आहे.
पीआयबी कडून सांगण्यात आले आहे की, ८ मे रोजी भारतीय सशस्त्र दलाने पाकिस्तानवर हवाई संरक्षण प्रणालीवर हल्ला केला आहे. पाकिस्तानकडून जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा, बारामुल्ला, उरी, पुंछ, मेंढर आणि राजौरी सेक्टरमध्ये तोफगोळे टाकण्यात आले. मोठ्या प्रमाणावर गोळीबार केला. त्यामुळे भारताचे १२ नागरिक आणि एक सैनिक यामध्ये शहीद झाला आहे.
Jan Sangharsh News
Author: Jan Sangharsh News

जन संघर्ष न्यूज लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें

Buzz4 Ai