जनसंघर्ष न्यूज / संपादक – संजय चांदगुडे
इंदापूरः- ( दि.७) इंदापूर तालुक्यातील बहुतांश गावांमधील केंद्र सरकारच्या हर घर जल योजनेची काम एक तर निकृष्ट दर्जाची झाली आहेत किंवा काही ठिकाणी कामे ही अपूर्ण आहेत, केंद्र सरकार प्रत्येक गाव तसेच वाडयावस्त्यांना स्वच्छ पिण्याचे पाणी मिळावे म्हणून एकीकडे कोट्यावधी रुपयांचा खर्च करत आहे परंतू ग्राऊंड लेवलला या योजनांचे तीन तेरा वाजल्याचे दिसून येत आहे त्यातच आता एक बातमी समोर आली आहे की,
इंदापूर तालुक्यातील रूई बाबीर येथील हर घर पेयजल योजनेचे काम खूप दिवसापासून रखडलेले होते , जानेवारी २०२५ पासून संबंधितांना पत्र व्यवहार करून देखील अद्याप पर्यंत प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची कार्यवाही न झाल्यामुळे आज बारामती याठिकाणी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना पुणे जिल्हा महामंत्री आकाश कांबळे यांनी रुई येथील हर घर जल योजनेचं काम बऱ्याच दिवसापासून बंद असल्याचे सांगितले.
यावरती लगेच तात्काळ बारामतीचे उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांना बोलवून ती योजना तात्काळ चालू करण्याचे आदेश यावेळी देण्यात आले. त्यामुळे ही पाइपलाइन ज्यांनी कोणी अडवली असेल त्यांच्यावर तात्काळ कायदेशीर कारवाई करण्यात यावी असे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रशासनाला सांगितले.
आज इंदापूर तहसील कार्यालयाच्या समोर रुई ग्रामस्थांच्या वतीने एक दिवसीय आंदोलन करण्यात आलेले होते. या आंदोलन स्थळी इंदापूर तालुक्याचे तहसीलदार जीवन बनसोडे यांनी प्रत्यक्ष भेट देवून संबंधितांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी वालचंदनगर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार डुणगे यांना पोलीस बंदोबस्तामध्ये जलजीवन योजनेच्या पिण्याच्या पाईपलाईनचे काम दिनांक १४ मे रोजी सकाळी ११ वाजता त्वरित चालू करण्याची कार्यवाही करण्याचे आदेश यावेळी दिले आहेत.
या आंदोलन प्रसंगी जनार्दन पांढरमिसे,आकाश कांबळे, आबासाहेब थोरात, यशवंत कचरे, तानाजी मारकड, अनिल कांबळे, प्रवीणकुमार शहा, अविनाश मोहिते, सतिश झेंडे, भाजपा पुणे जिल्हा अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मयूर कांबळे, ॲड किशोर अडसूळ, बंडु डोंबाळे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

Author: Jan Sangharsh News
जन संघर्ष न्यूज लाईव्ह
Post Views: 646