जनसंघर्ष न्यूज नेटवर्क
पुणे :- जम्मू काश्मीरमधील पहलगाम आतंकवादी घटनेला आज तेरा दिवस झालेत .. पाकिस्तानचे तेरावे घालण्याचे भारतीयांचे स्वप्न अजूनही प्रत्यक्षात सत्यात उतरत नाही.. प्रधानमंत्री मोदी निवडणूक कार्यक्रम, मनोरंजनाचे कार्यक्रम करीत देशभर फिरत आहेत, जनता टाळी थाळी वाजवत समाधान व्यक्त करत आहे..
आपण सारे अस्वस्थ आहोत..
अत्यंत निर्दयीपणे अतिरेक्यांनी भारतीयांचे बळी घेतले आहेत.. त्यामध्ये देशातील २७ कुटुंबं उघड्यावर पडली आहेत.. आणि आपण फक्त पाकिस्तानला धमक्या देत आहोत.. जे बळी गेलेत त्यांना खरंच न्याय मिळणार आहे की, नाही ? याचा कालापव्यय सुरू आहे?
प्रश्न असंख्य आहेत, उत्तरं द्यायला कोणी समोर येत नाही आणि प्रश्न विचारणाऱ्यांना देशद्रोही, ठरवून आरोपी केलं जात आहे..
विषण्णता दाखवणारी परिस्थिती आहे ही सारी..
पहलगाम मध्ये जे घडले त्याला आज तेरा दिवस उलटून गेले आहेत.. या तेरा दिवसात काय घडले याचं विश्लेषण करणारा लेख येथे देत आहे.. लेख मोठा झाल्याने तो दोन भागात देतोय……..
दिवस_तेरावा…
मोदीजी लगे रहो… (भाग पहिला)
नरेंद्र मोदी यांचा मला कायम हेवा वाटत आलाय.. पंतप्रधान पदाची ११ वर्षे त्यांनी मस्त एन्जॉय केलीत.. ते जगभर फिरले,
भरपूर प्रसिध्दी मिळविली,
वेगवेगळे पोषाख परिधान करीत छानपैकी फोटोशूट केले ,
अनिवासी भारतीयांना मोदी मोदींचे नारे द्यायला लावले..
कपडे बदलण्याच्या विषयात तर शिवराज पाटील चाकूरकर त्यांच्या पासंगालाही पुरणार नाहीत..एवढे ते कपड्याचे शौकीन…..
माय फ्रेड म्हणत जगभरातील अनेक नेत्यांच्या गळाभेटी घेतल्या..
आणखी काय हवं असतं माणसाला?
ते मस्त, अगदी हेवा वाटावा अशी लाईफ जगले..
ते फकीर असल्यानं त्यांनी जे केलं ते सारं अर्थातच सरकारी खर्चाने..
हे भाग्य साऱ्यांनाच नाही मिळू शकत राव.. ..
किमान गेली ११ वर्षे ते आनंदी जीवन जगले..
जीवन जगताना ते कधी चिंतेत आहेत,
तणावात आहेत,
काळजीनं चेहरा काळवंडलाय असं कधी झालं नाही, किमान आपल्याला तसं दिसलं नाही..
महागड्या मशरूमच्या माध्यमातून चेहरा गोरा आणि ताजातवाना ठेवण्याचा त्यांनी प्रयत्न केला..
देश अडचणीत आहे,
संकटात आहे असं मोदींच्या चेहरयाकडं पाहून कधी वाटलंच नाही..ते जेव्हा बाहेर जात तेव्हा त्यांच्या चेहऱ्याकडं पाहून असंच वाटायचं
ये आजके भारत की छबी है!
२०१४ पुर्वीचा तो गरीब, अर्धपोटी जगणारा, अंगावर वस्त्र नसलेला भारत देश आता राहिला नाही असंच कोणालाही वाटायचं..तेही तसं बाह्य जगाला दाखवायचे..
देश बदल गया है!
हे त्यांनी जगाला दाखवून दिलं..
भारत आज आनंदात आहे, कोणतेही दु:ख नाही आबादी आबाद आहे.. हे ते जगाला पटवू शकले..
आजही बघा,
पहलगाम घडल्यानंतर संपुर्ण देश शोकसागरात बुडालाय..
२७ कुटुंबाचा आक्रोश कोणत्याही संवेदनशील माणसाचं काळीज चिरून जात आहे..
“आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे” या रास्त मागणीचा टाहो ही जनता फोडते आहे..
मात्र आमच्या पंतप्रधानांचा चेहरा बघा,
अगदी निर्विकार आहे..जसं काही घडलंच नाही..
ही साधनेची किमया आहे की,
“संकट कितीही गहिरं असलं तरी देशाच्या पंतप्रधानांनी चेहऱ्यावर तणावाची रेषा ही दिसू देता कामा नये” असा दंडक जणू घटनेत घालून दिलेला आहे ?
नाही, मला माहिती नाही म्हणून विचारलं…
१३ दहशतवाद्यांनी देशाचं नाक कापावं असा हल्ला भारताच्या शिरपेचावर केलेला आहे हे किमान पंतप्रधानांच्या चेहऱ्यावर तरी दिसत नाही..
मोदींचा हाच बिनधास्तपणा, सर्वसामांन्यांबद्दलची बेकिकीरवृत्ती मला भावते
इतने बडे देश मे ऐसी छोटी – मोठी घटनाए तो होती रहती है! उसका क्या टेन्शन लेने का?
असं तर त्यांना वाटत नसेल का?
आनंदी राहायचं,
काळजी हा माणसाचा मोठा शत्रू आहे असं डॉक्टर सांगतात.. डॉक्टरांचं नाही ऐकायचं तर मग काय राहूल गांधींचं ऐकायचं? असा प्रश्न भक्त बिनधास्त विचारू शकतात..
मोदीजी लगे रहो…
पहलगाम आतंकवादी हामला घडला त्या दिवशी प्रधानमंत्री मोदी हे सौदीत होते..
बातमी कळताच ते तात्काळ भारतात आले..,
शेवटी काळजी आहे, हे देशाला दिसायला नको?
अतिरेक्यांनी थेट ५६ इंचवाल्या मोदींशीं पंगा घेतला होता ?
आम्हाला वाटलं आता पाकड्यांची काही खैर नाही..
माहौलच तसा निर्माण केला गेला होता..
मंत्रिमंडळ बैठक झाली..
किसी को नही छोडा जाएगा,
जमिन मे गाड देंगेची
भाषा ऐकून आमचं ऊर भरून आलं.. आता इंदिरा गांधी यांनी पाकचे दोन तुकडे केले होते हे पार विसरून जायचं, आता फक्त मोदी आणि त्यांची ५६ इंच की,छाती एवढंच लक्षात ठेवायचं असंही आम्ही ठरवलं..
एका धमकीलाच पाकडे घाबरले, थरथर कापू लागले, किमान मोदी मिडियाचे चँनल्स तसं दाखवू लागले..
लष्करी कारवाई न करताच आम्ही न्यूज चँनलवरून युध्द जिंकले होते.. सारा माहौल पाहून आम्ही, भक्तगण आणि दस्तुरखुद्द मोदी ही खूष झाले असावेत..
मोदींना वाटलं आता वेगळं काही करायची गरजच नाही..
दुसऱ्याच दिवशी नरेंद्र मोदी आपल्या कामाला लागले..
निवडणूक आणि निवडणूक प्रचार हा त्यांचा आवडता छंद .. जाहीर सभांमधून कितीही थापा मारल्या तरी विचारणारं कोणी नसतं.. समजा कोणी विचारलंच तर
अमित शहा हे मदतीला असतातचं,
भाई ओ तो निवडणूक जुमला था.. असं सांगून टाकलं की विषय मिटतो ..( क्रमशः)

Author: Jan Sangharsh News
जन संघर्ष न्यूज लाईव्ह
Post Views: 664