जनसंघर्ष न्यूज नेटवर्क
इंदापूर :- इंदापूर तालुक्यातील छत्रपती सहकारी साखर कारखाना हा या भागातील शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी उभारण्यात आला होता त्यामुळे शेतकऱ्यांचे अर्थकारण या कारखान्यावरती विसंबून आहे तसेच या कारखान्याची निवडणूकही बऱ्याच दिवसांपासून रखडली होती आज अखेर याचा निवडणूक कार्यक्रम हा निवडणूक प्राधिकरणाकडून घोषित करण्यात आला तो पुढील प्रमाणे आहे , ज्या अर्थी, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे ७३ कब मधील तरतुदीस अनुसरुन दिनांक ३०/०३/२०१३ रोजी अधिसूचनेद्वारे राज्य सहकारी संस्थांच्या निवडणुकांचे अधिक्षण, निर्देशन, संचालन व नियंत्रण याची जबाबदारी प्राधिकरणावर आहे. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने महाराष्ट्र सहकारी संस्था (समितीची निवडणूक) नियम २०१४ नियम ३ (v) नुसार राज्यातील संचालक मंडळाची मुदत संपलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रिया सुरु करणेचे घोषणा/आदेश जिल्हा/तालुका/वार्ड सहकारी निवडणूक अधिकारी यांना उपरोक्त वाचावे क्र. २ व ३ मधील तरतूदीनुसार दिलेले आहेत. आणि,
ज्या अर्थी, श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना लि. भवानीनगर ता. इंदापूर जि. पुणे या कारखान्याच्या संचालक मंडळाची मुदत दिनांक ११/०५/२०२० रोजी संपुष्टात आलेली आहे. जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा प्रादेशिक सहसंचालक (साखर), पुणे विभाग, पुणे यांनी सदर कारखान्याची निवडणूक प्रक्रिया सुरू करुन प्रारुप व अंतिम मतदार यादी प्रसिध्द केलेली होती. तथापि मा. उच्च न्यायालयाकडील संदर्भ क्र. ३ चे आदेशान्वये सदर कारखान्याच्या निवडणूकीस स्थगिती दिलेली आहे. मात्र तदनंतर मा. उच्च न्यायालयाकडील संदर्भ क्र. ४ चे आदेशान्वये आदेशित केलेनुसार जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा प्रादेशिक सहसंचालक (साखर), पुणे विभाग, पुणे यांनी सदर कारखान्याची निवडणूक प्रक्रिया सुरु करुन प्राथमिक मतदार यादीकरीता अर्हता दिनांक निश्चित करुन मिळणेबाबत प्राधिकरणास विनंती केलेनुसार प्राधिकरणाने संदर्भ क्र. ५ चे आदेशान्वये अर्हता दिनांक निश्चित करुन दिलेला आहे. सदर अर्हता दिनांकावर कारखान्याची प्रारुप मतदार यादी दिनांक १२/०७/२०२३ रोजी व अंतिम मतदार यादी दिनांक ०२/०८/२०२३ रोजी प्रसिध्द केली. जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा प्रादेशिक सहसंचालक (साखर), पुणे विभाग, पुणे यांनी विनंती केलेनुसार प्राधिकरणाने संदर्भ क्र. ६ च्याआदेशान्वये सदर कारखान्याच्या निवडणूकीकरीता निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्री. वैभव नावडकर, उपविभागीय अधिकारी, उपविभाग बारामती जि. पुणे यांची नेमणूक केलेली आहे. आणि,
ज्या अर्थी, मा. उच्च न्यायालय, मुंबई येथे दाखल याचिका क्र. ९५४७, ९५५७ व ९५५८/२०२३ मध्ये मा. न्यायालयाने संदर्भ क्र. ७ चे आदेशान्वये सदर कारखान्याची नव्याने प्रारुप व अंतिम मतदार यादी प्रसिध्द करणेबाबत आदेशित करुन त्या याचिका निकाली काढलेल्या आहेत. त्यानुसार कार्यवाही करून जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा प्रादेशिक सहसंचालक (साखर), पुणे विभाग, पुणे यांनी नव्याने अर्हता दिनांक मिळणेबाबत केलेल्या विनंतीनुसार प्राधिकरणाने संदर्भ क्र. ८ च्या आदेशान्वये उक्त कारखान्याच्या निवडणूकीसाठी दिनांक ०१/०९/२०२३ हा अर्हता दिनांक निश्चित करुन दिलेला आहे. सदर अर्हता दिनांकावर कारखान्याच्या निवडणूकीसाठी प्रारुप मतदार यादी दिनांक ०६/१०/२०२३ रोजी व अंतिम मतदार यादी दिनांक २५/१०/२०२३ रोजी प्रसिध्द केली. आणि,
ज्या अर्थी, मा. उच्च न्यायालय, मुंबई येथे दाखल याचिका क्र. १३५४१, १४०२५, १४०२६ व १४०२७/२०२३ मध्ये मा. न्यायालयाने संदर्भ क्र. ९ चे आदेशान्वये जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी यांनी त्यांचे कार्यालयाकडील दि. २०.१०.२०२३ रोजीचे आदेश मागे घेतल्यामुळे सदर याचिकांमध्ये तथ्य नसल्यामुळे सदर याचिका निकाली काढलेल्या आहेत. आणि,
ज्या अर्थी, मा. उच्च न्यायालय, मुंबई येथे दाखल याचिका क्र. १५३४२, १५३४४, १५३५१ व १५३४३/२०२३ मध्ये मा. न्यायालयाने संदर्भ क्र. १० चे आदेशान्वये जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी यांनी त्यांचे कार्यालयाकडील दिनांक ३०.११.२०२३ रोजीचे आदेश मागे घेतल्यामुळे सदर याचिकांमध्ये तथ्य नसल्यामुळे सदर याचिका निकाली काढून दिनांक ०४/०१/२०२४ पर्यंत लेखी म्हणणे सादर करणेबाबत व त्या अनुषंगाने जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी यांनी फेर आदेश निर्गमित करणेबाबत निर्देश दिलेले आहेत. त्यानुसार जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी यांनी आदेश फेर आदेश निर्गमित करुन अंतिम मतदार यादी दिनांक २४/०५/२०२४ रोजी प्रसिध्द केलेली आहे. आणि,
ज्या अर्थी, तसेच मा. उच्च न्यायालय, मुंबई येथे दाखल याचिका क्र. २८९५/२०२४ मध्ये मा. न्यायालयाने संदर्भ क्र. ११ चे आदेशान्वये सदर कारखान्याचा निवडणूक कार्यक्रम दिनांक ३१/०५/२०२४ नंतर घोषित करणेबाबत आदेशित करुन सदर याचिका निकाली काढलेली आहे. आणि, Office
ज्या अर्थी, मा. उच्च न्यायालय, मुंबई येथे दाखल याचिका क्र. ६५२६ व ७७९९/२०२४, याचिका क्र (स्टॅम्प) १२३०२ न याचिका क्र. ६५२६ व १२३१४/२०२४ मध्ये मा. न्यायालयाने संदर्भ क्र. १२ चे आदेशान्वये सदर याचिका खारीज केलेल्या आहेत. तसेच मा. न्यायालयाकडील दि. ३०/०५/२०२४ रोजीच्या आदेशान्वये दिलेले अंतरिम आदेश पुढे चालू ठेवण्याबाबतची विनंती अमान्य केलेली आहे. आणि,
ज्या अर्थी, सदर आदेशास अनुसरून प्राधिकरणाने संदर्भ क्र. १३ अन्वये श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना लि. भवानीनगर ता. इंदापूर जि. पुणे या कारखान्याची निवडणूक प्रक्रिया सुरु करण्याच्या अनुषंगाने आवश्यक ती कार्यवाही करणेबाबत जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा प्रादेशिक सहसंचालक (साखर), पुणे विभाग, पुणे यांना कळविलेले आहे. त्यानुसार त्यांनी संदर्भ क्र. १४ चे पत्रान्वये, निवडणूक निर्णय अधिकारी यांनी सादर केलेला उक्त कारखान्याचा निवडणूक कार्यक्रम प्राधिकरणाच्या मान्यतेस्तव सादर केलेला आहे. आणि,
ज्या अर्थी, निवडणूक नियम १८ नुसार निवडणूक कार्यक्रमास प्राधिकरणाने मान्यता देणेची तरतुद आहे. आणि, त्या अर्थी, प्राधिकरण उक्त निवडणूक कार्यक्रमाबाबत पुढीलप्रमाणे आदेश देत आहे.
-: आदेश काय आहेत ? :-
महाराष्ट्र सहकारी संस्था (समितीची निवडणूक) नियम २०१४ चा नियम १८ नुसार प्राधिकरणास प्राप्त झालेल्या अधिकारानुसार श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना लि. भवानीनगर ता. इंदापूर जि. पुणे या कारखान्याचा सोबत जोडलेल्या “परिशिष्ट- अ प्रमाणे निवडणूक कार्यक्रम मंजूर करण्यात आला आहे.
मा. आयुक्त, राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे मान्यतेने. महाराष्ट्र राज्य पुणे (अशोक गाडे) सचिव राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य, पुणे.

Author: Jan Sangharsh News
जन संघर्ष न्यूज लाईव्ह