जनसंघर्ष न्यूज नेटवर्क
बारामती :- येथील गणेश पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट आयोजित गणेश क्रीडा महोत्सव 2025 चे आयोजन इन्स्टिट्यूटचे संचालक गणेश सवाने यांनी केले होते या क्रीडा मोहत्सवात इन्स्टिट्यूटच्या सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता यावेळी बोलताना गणेश सवाने म्हणाले की, विद्यार्थ्यांचा यामध्ये असणारा उत्साह, तसेच स्पर्धात्मक युगात टिकून राहण्याची क्षमता आणि त्यांच्यामध्ये असणारा क्रीडा भावनेचा उत्कृष्ट संगम याप्रसंगी आम्हा सर्वांना पहावयास मिळाला.
या क्रिकेट सामन्यामध्ये अनुष्का ईनामके कर्णधार असलेल्या Muscle Hitters आणि सायली सोनवणे कर्णधार असलेल्या Bacterial Blasters संघात अंतिम सामना रंगला होता,ज्यामध्ये अतिशय रोमहर्षक लढतीनंतर Bacterial Blasters संघाने यामध्ये विजय मिळवला!
विद्यार्थ्यांसह संपूर्ण स्टाफने या क्रिकेटचा आनंद घेतला. या क्रिडामहोत्सव प्रसंगी सीनियर नॅशनल कबड्डी खेळाडू, दबंग दिल्ली प्रो कबड्डी संघाचे माजी खेळाडू आणि NIS कबड्डी प्रशिक्षक श्री. दादासो आव्हाड यांच्या प्रमुख उपस्थितीने हा कार्यक्रम अधिक प्रेरणादायी ठरला.त्यांचे मार्गदर्शन आणि अनुभव विद्यार्थ्यांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल.
या खेळांदरम्यान सकाळी १० वाजेनंतर उन्हाचा प्रादुर्भाव हा प्रकर्षाने जाणवत होता, ज्यामुळे उष्णतेचा झटका बसण्याचे काही प्रसंग पाहायला यावेळी मिळाले.त्यामुळे भविष्यात अशा स्पर्धांमध्ये स्वतःच्या आरोग्याची विशेष अशी काळजी घेणे गरजेचे आहे. तसेच क्रिडा महोत्सवाने एकता,संघर्ष आणि क्रीडा स्पिरिट यांचे उत्तम असे उदाहरण घालून दिले आहे.असे मत गणेश पॅरामेडीकल इन्स्टिट्यूटचे संचालक गणेश सवाने यांनी व्यक्त केले.

Author: Jan Sangharsh News
जन संघर्ष न्यूज लाईव्ह