जनसंघर्ष न्यूज नेटवर्क
बारामतीः– दि.15 मार्च २०२५ रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मातंग आघाडीच्या वतीने बारामती आणि इंदापूर या दोन तालुक्यांमध्ये विविध गावच्या ठिकाणी गाव तेथे शाखा या उपक्रमाअंतर्गत मातंग आघाडी शाखांच्या उद्घाटनाचा कार्यक्रम घेण्यात आला , यावेळी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आनंद अण्णा वायदंडे, महाराष्ट्र प्रदेश जनरल सेक्रेटरी महादेव बाबर , पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रदीप भाऊ कांबळे, यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
या कार्यक्रम प्रसंगी पुणे जिल्हा अध्यक्ष श्रीकांत कदम, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सुनील भाऊ शिंदे, पश्चिम महाराष्ट्र संघटक सचिव दत्ताभाऊ चव्हाण, पुणे जिल्हा उपाध्यक्ष सोमनाथ झोंबाडे, प्रीतम लांडगे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष, पारवडी शाखा अध्यक्ष शहाजी लांडगे, पुणे जिल्हा सरचिटणीस अनिल भाऊ लांडगे, बारामती तालुका अध्यक्ष संजय वाघमारे, बारामती तालुका मातंग आघाडी अध्यक्ष अशोक कुचेकर , इंदापूर तालुका अध्यक्ष राजेंद्र खंडाळे , पुणे जिल्हा संघटक साहेबराव खंडाळे पुणे जिल्हा महिला अध्यक्ष नेहा ताई पवार, पुणे जिल्हा सरचिटणीस लोकरे ताई, इत्यादी पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे मोठ्या संख्येने यावेेळी उपस्थित होते.
या शाखांचं उद्धघाटनाचे नियोजन हे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रमोद खंडाळे व महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सीमाताई घोरपडे यांनी केले होते. याप्रसंगी विविध ठिकाणी या पाच शाखांच्या उद्घाटनाचा कार्यक्रम यावेळी पार पडला.
पुणे जिल्ह्यामध्ये केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री माननीय नामदार रामदासजी आठवले यांचे हात बळकट करण्यासाठी व शिव फुले शाहू आंबेडकर चळवळीमध्ये मोठ्या संख्येने तरुण वर्गास मार्गदर्शन व्हावे यासाठी पुणे जिल्हा अध्यक्ष प्रमोद खंडाळे व महिला अध्यक्ष सीमाताई घोरपडे यांनी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आनंद अण्णा वायदंडे व पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रदीप भाऊ कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्ह्यात त्यांचे जोमाने काम चालू केले आहे त्यासाठी त्यांना पुढील सामाजिक तसेच राजकीय कार्यास खूप खूप शुभेच्छा. व इथून पुढे असंच आपण शिव फुले शाहू आंबेडकर चळवळीमध्ये अग्रेसर राहून काम करावे हीच आपणास येणाऱ्या पुढील काळात शुभेच्छा देतो असे बोलतात दत्ता चव्हाण पुणे शहर सचिव तथा पश्चिम महाराष्ट्र संघटक सचिव(मा.आघाडी) रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आठवले गट) म्हणाले आहेत.

Author: Jan Sangharsh News
जन संघर्ष न्यूज लाईव्ह