तलाठी कार्यालयात चकरा मारण्याची गरज संपली ; ई-हक्क प्रणाली अंतर्गत ११ सेवा झाल्या ऑनलाईन.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

जनसंघर्ष न्यूज नेटवर्क
बारामतीः– राज्य सरकारच्या महसूल विभागाच्या वतीने ई-हक्क प्रणाली सुरू केली असून, त्याअंतर्गत ११ वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा ऑनलाइन पुरविल्या जात आहेत त्यामध्ये वारसनोंद, ई-करार, कर्जाचा बोजा चढविणे इत्यादी कामांसाठी शेतकर्‍यांना यापुढील काळात तलाठी कार्यालयात जाण्याची गरज लागणार नाही, अशी माहिती बारामती उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांच्या कडून देण्यात आली आहे.

या प्रसंगी तहसीलदार गणेश शिंदे यांची उपस्थिती होती. वैभव नावडकर यांच्याकडून १०० दिवस या उपक्रमांतर्गत राबविण्यात येत असलेल्या विविध कार्यक्रमांची या प्रसंगी सविस्तर माहिती देण्यात आली. ई-हक्क प्रणालीद्वारे अकरा प्रकारच्या सेवा ह्या आता ऑनलाइन उपलब्ध असणार आहेत. तसेच त्याचा लाभ महा-ई-सेवा केंद्राद्वारे नागरिक घेऊ शकनार आहेत, असे वैभव नावडकर यांनी बोलताना म्हणाले आहेत.

बारामती आणि इंदापूर या दोन तालुक्यात सात-बारा उतार्‍यातील अडचणी, फेरफार नोंदीं करण्याचा कालावधी हा कमी करण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न केला जात आहे. बारामतीमध्ये फेरफार नोंदी १९ दिवसांत, तर इंदापूर मध्ये २१ दिवसांच्या आतमध्ये होत असल्याचे पाहवयास मिळत आहे. ई-हक्क प्रणाली या ऑनलाईन सेवेद्वारे बारामती मध्ये १८१७, तर इंदापूर तहसील मध्ये ७५८ अर्ज ऑनलाइन पद्धतीनेच दाखल झाल्याचे यावेळी वैभव नावडकर म्हणाले.

बारामती तहसील ऑफीस /प्रांत ऑफीसचे कामकाज ई-ऑफिसद्वारेचं

बारामतीत तहसील व प्रांत कार्यालयाचे कामकाज आता ई-ऑफिसद्वारे चालविले जात आहे. त्या मधून प्रलंबित असणाऱ्या कामांची सर्व माहिती मिळत असते. तसेच नागरिकांना त्यांनी दाखल केलेल्या प्रकरणांची माहिती ई-मेलद्वारे मिळत असते. संपूर्णपणे संगणकीकृत कामकाज चालविले जात असल्याकारणाने लिपिका पासून ते अधिकार्‍यांपर्यंत कोणती काम किती दिवसांपासून प्रलंबित आहेत, याची वेळोवेळी माहिती मिळत असते. बारामतीमध्ये आतापर्यंत संगणकीकृत प्रणालीवर १००९ इतक्या तक्रारी दाखल झाल्या असून, त्यांचा निपटारा करण्याचे काम युद्धपातळीवर आमच्या कार्यालयाकडून केले जात असल्याचे त्यांच्याकडून यावेळी सांगण्यात आले.

शासनाच्या सौर योजनेचा फायदा शेतकऱ्यांनी घ्यावा – वैभव नावडकर

मुख्यमंत्री सौर कृषी योजनेंतर्गत बारामती तालुक्यात मुरुम, जळगाव सुपे आणि कन्हेरी येथील गावामध्ये सौर प्रकल्प कार्यान्वित करण्यात आले आहेत. त्यामुळे त्या परिसरातील शेतकर्‍यांच्या विजेचा प्रश्न सुटला असल्याची माहिती यावेळी वैभव नावडकर यांच्याकडून देण्यात आली. प्रधानमंत्री सूर्यघर वीज योजनेचा सुद्धा आपण फायदा घ्यावा. तसेच बारामती मध्ये ८४ शासकीय कार्यालयं ही सौरऊर्जेचा वापर करून सौर ऊर्जेवर आणण्यात आली आहेत. या योजनेमधून एक किलो वॅटच्या प्रकल्पासाठी ६० हजार रुपये इतका खर्च येत असतो. त्याला ३० हजार रुपये इतके शासनाकडून अनुदान देण्यात येते. एक किलोवॅट सौरउर्जा प्रकल्पामधून सधारणता १२० युनिट पर्यंत वीज तयार होत असल्याचे वैभव नावडकर यांच्याकडून सांगण्यात आले.

अ‍ॅग्रीस्टॅक योजनेमध्ये शेतकर्‍यांनी सहभाग नोंदवावा

सरकार कडून प्रत्येक शेतकर्‍याला युनिक फार्मर आयडी देण्यासाठी अ‍ॅग्रीस्टॅक ही योजना सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे यापुढे शेतकऱ्यांना कर्ज किंवा इतर कामांसाठी कोणत्याही प्रकारचे जमीनेचे उतारे देण्याची गरज भासणार नाही. या निर्माण झालेल्या आयडीद्वारेच शेतकर्‍यांची सर्व कामे ही होणार आहेत. यामध्ये बहुतांस शेतकर्‍यांनी सहभाग घेणे अपेक्षित आहे.

आतापर्यंत बारामती तालुक्यातील ४८ हजार ९९४, तर इंदापूर तालुक्यातील २६,१६० इतक्या शेतकर्‍यांकडून यामध्ये सहभाग नोंदविण्यात आला आहे. तसेच पीएम किसान योजनेतील सर्व शेतकर्‍यांनी असे कार्ड काढावं, असे आवाहन वैभव नावडकर यांच्या कडून करण्यात आले. बारामती तालुक्यातील पीएम किसान योजनेंतर्गत ३०६८३ तर इंदापुर तालुक्यातील ६०३२० इतक्या शेतकर्‍यांनी नोंदणी केली आहे.

Jan Sangharsh News
Author: Jan Sangharsh News

जन संघर्ष न्यूज लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें

Buzz4 Ai