जनसंघर्ष न्यूज नेटवर्क
पुणे :- महाराष्ट्रात घरकुलाचे बांधकाम करणाऱ्या नागरिकांसाठी आनंदाची बातमी आता समोर आली आहे. घरकुल बांधकाम करणाऱ्या लाखो लाभार्थ्यांना राज्य सरकारच्या वतीने पाच ब्रास वाळू ही मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाची घोषणा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून करण्यात आली आहे.राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयाचा फायदा घरकुलाचे बांधकाम करत असलेल्या लाखो लाभार्थ्यांना होण्याची शक्यता आहे.
यावेळी बोलताना महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत की, ज्या ठिकाणचे वाळूचे लिलाव झालेले नाहीत. तसेच ज्या ठिकाणी आम्हाला एन्व्हायरमेंट क्लियरन्स मिळालाय. त्या ठिकाणीच वाळू घाटांचे लिलाव होणार आहेत. तसेच घरकुल लाभार्थ्यांना ५ ब्रास मोफत वाळू देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारच्या वतीनं घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठीची तरतूद आम्ही करणार आहोत, अशे बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
तसेच एकंदरीत जेवढी मागणी असेल, तेवढा पुरवठा असे वाळू धोरण आपण तयार करत आहे. त्यासाठी एम सँड धोरण येणार आहे. त्यामध्ये दगड खाणीतून येणाऱ्या वाळू साठी आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये स्टोन क्रेशरसाठी प्रोत्साहन देत आहोत. त्यामाध्यमातून दगडापासून मोठ्या प्रमाणात वाळू तयार होणार असून, त्यामुळे नदीतील वाळूची मागणी ही यामुळे कमी होणार आहे. तसेच येणाऱ्या २ वर्षांत वाळूची मागणी आणि पुरवठा यामध्ये जी काही तफावत आहे ती दूर करण्यात येईल, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांसमोर सांगितले.

Author: Jan Sangharsh News
जन संघर्ष न्यूज लाईव्ह
One Response
Rohan bande