शिरवळ पोलीसांनी टाकलेल्या छाप्यात,तब्बल एक कोटींच्या वरचा मुद्देमाल हस्तगत;चार जणांना अटक .!!

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 जनसंघर्ष न्यूज नेटवर्क
खंडाळा :- तालुक्यातील शिरवळ पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये अवैधरित्या गुटख्याचा साठा तसेच गुटखा तयार करण्यासाठी लागणारे साहित्य पोलिसांकडून जप्त करत या वर्षातील सर्वात मोठी कारवाई करण्यात आली आहे. या टाकलेल्या छाप्यात एकूण 1 कोटी 6 लाख 19 हजार 270 रुपये इतका मुद्देमाल जप्त केला आहे.

सातारा जिल्ह्यातील शिरवळ परिसरात अवैध धंद्यांविरोधात सुरू असलेल्या कारवाई दरम्यान दि. 6 मार्च या दिवशी शिरवळ येथील पंढरपूर फाट्यावरील स्टार सिटी सोसायटी मधील गाळा दुकानावर पोलिसांनी छापा टाकत. यामध्ये तब्बल 83.19 लाख रुपयांचा गुटखा, तसेच 18.50 लाख रुपये किंमतीचे गुटखा तयार करण्याचे साहित्य तसेच त्यासाठी लागणारी मशिनरी, आणि 4.50 लाख रुपये किंमतीचे चारचाकी वाहन असा मुद्देमाल पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आला.

या कारवाईमध्ये पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक यशवंत नलवडे यांच्यासह शिरवळ पोलीसांच्या वतीने ही कारवाई करण्यात आली आहे.

पोलिसांकडून करण्यात आलेल्या कारवाईमध्ये सुनील पुतन सिंह (नवले ब्रिज, पुणे, राहुल हरीलाल देपन (वय 24 वर्षे), कन्हैयालाल काळूराम गेहलोत (वय 30), पुष्पेंद्र इकबाल सिंह (वय 28 वर्षे),  कामटे स्वप्निल नामदेव देवकर (चोरी मळा, जुन्नर, पुणे) व इतर 3 यांच्या सह 8 जणांवर पोलीसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील 4 आरोपींना अटक करण्यात आली असून, यासाठी वापरण्यात आलेले दोन गाळे देखील पोलिसांकडून सील केले आहेत.

या कारवाईमध्ये अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त तुषार शिंगाडे, तसेच अन्न सुरक्षा अधिकारी वंदना रुप्नवर, इम्रान हवालदार आणि प्रियंका वाईकर यांनी सहभाग घेतला होता. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर शिरवळ पोलिस तसेच अन्न औषध प्रशासन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ही कारवाई करत छापा टाकण्यात आला होता व त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर गुटख्याचा साठा हा पोलिसांकडून जप्त करण्यात आला.

या कामी शिरवळ पोलीस निरीक्षक यशवंत नलवडे, सहायक पोलीस निरीक्षक महादेव शिद, पोलीस अंमलदार शशिकांत भगत, सुधाकर सुर्यवंशी धरमसिंग पावरा, सचिन वीर, तुषार कुंभार, भाऊसाहेब दिघे, सुरज चव्हाण, अरविंद बहऱ्हाळे, तुषार अभंग , दिपक पालेपवाड, सुधाकर सपकाळ, अजित बोराटे व होमगार्ड संतोष इंगवले इत्यादींनी सहभाग घेतला होता.

शिरवळ पोलिसांच्या वतीने करण्यात आलेली आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई आहे त्यामुळे अवैध धंदे करणाऱ्यांसाठी पोलिसांच्या वतीने जणूकाही हा इशाराच असल्याचे यामधून दिसून येत आहे . पुढील काळात सुद्धा अशा प्रकारच्या अवैधरित्या धंदा करणाऱ्या लोकांवर पोलिसांकडून कडक कारवाई केली जाणार आहे व अवैद्य धंद्यांचा बिमोड केल्याशिवाय पोलिस प्रशासन शांत बसणार नाही असे पोलीस निरीक्षक यशवंत नलवडे यांनी माध्यमांना बोलताना सांगितले.

Jan Sangharsh News
Author: Jan Sangharsh News

जन संघर्ष न्यूज लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें

Buzz4 Ai