आळंदी हादरली,वारकरी संस्थेत अल्पवयीन मुलाचं लैंगिक शोषण;पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

जनसंघर्ष न्यूज नेटवर्क

 आळंदी :- (दि.५) पुणे जिल्ह्यातील आळंदी या गावामध्ये एक अत्यंत माणूसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. तीर्थक्षेत्र म्हणून ओळख असणाऱ्या आळंदी या गावातील एका नामांकित वारकरी संस्थेत १५ वर्षाच्या एका विद्यार्थ्याचा लैंगिक छळ करण्यात आल्याची धक्कादायक घटना आता समोर आली आहे.या प्रकरणामध्ये वारकरी संस्थेतील २ महाराजांवर मंगळवार रोजी रात्री उशिरापर्यंत दिघी पोलीसांकडून बाल लैंगिक शोषण पोक्सो कायदयाअंतर्गत गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.

दिघी पोलिसांच्या माहितीनुसार, पिडित मुलगा हा अलावयीन बालक आहे. सदरची घटना जानेवारी महिन्यामध्ये घडली असून पिडीत बालक आपले रात्रीचे जेवण करून बाकीच्या मुलांसोबत झोपला असता. त्याचवेळी रात्री १२ ते १ वाजताच्या दरम्यान आरोपी गौरव माळी हा पिडीत बालकाच्या जवळ येवून झोपला होता त्यानंतर त्याने अश्लिल चाळे करण्यास सुरुवात केली. तसेच त्याने शरीरसंबंध करण्याची त्या मुलाकडे मागणी केली. लागोपाठ ३ दिवस हा प्रकार आरोपीकडून संबंधित मुलासोबत केला होता. त्यानंतर घडलेल्या घटनेची माहिती पिडीत मुलाने महेश नरोडे यांना सांगितला. परंतू महेश नरोडे यांनी कोणतीही कारवाई केली नाही. तसेच घरच्या लोकांना सांगू नको अशी धमकी सुद्धा त्या पिडीत मुलाला दिली. अखेर पिडीत मुलाने दिघी पोलिस ठाण्यामध्ये जाऊन आपल्या सोबत घडलेल्या प्रकाराची फिर्याद दिली.

आळंदीमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून तीन वेळा अशा घटना घडल्याने आळंदीतील ग्रामस्थांच्या वतीने संताप व्यक्त करण्यात आला होता. तसेच अशा घटना वारंवार होऊ लागल्याने आळंदीतील सर्व वारकरी शिक्षण संस्था आता बंद करण्यात याव्यात. अशी मागणी ग्रामस्थांकडून पुन्हा जोर धऱू लागली आहे. या घटनेच्या पुर्वी आळंदी ग्रामस्थांच्या वतीनं राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपालीताई चाकणकर यांना आळंदीत विविध संस्थांमधून बालकांचे होणारे शारीरिक तसेच आर्थिक शोषण हे थांबविण्यात यावे म्हणून निवेदन दिले होते.

यापुर्वी महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपालीताई चाकणकर यांच्याकडून आळंदी पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक यांच्यासोबत बैठक पार पडली. त्यानंतर त्यांच्याकडून पोलीसांना सुचना करण्यात आल्या की, सर्व वारकरी संस्थांची तपासणी करून ४८ तासाच्या आतमध्ये कारवाई करण्यात यावी. त्यानंतर सर्व सरकारी यंत्रणा यांनी एकत्र येत १६५ वारकरी संस्थांची तपासणी करण्यात आली आणि या तपासणीचा अहवाल जिल्हाधिकारी पुणे यांचेकडे सुपूर्त करण्यात आला. त्यानंतर मात्र पुढची होणारी कार्यवाही ठप्प झाली. त्यामुळे अद्यापही मुलांच्या लैंगिक शोषणाच्या घटना  उघड होताना दिसत आहे. आता तरी राज्यसरकारने या गोष्टींची गंभीरपणे दखल घेऊन अशा वारकरी संस्था कायमच्या हद्दपार कराव्यात जेणेकरून अशा लैंगिक शोषणाच्या घटना वारंवार घडणार नाहीत अशी मागणी आता आळंदी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे.

Jan Sangharsh News
Author: Jan Sangharsh News

जन संघर्ष न्यूज लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें