महिला सरपंचांच्या पतींची ; ग्रामपंचायत प्रशासनातील लुडबूड होणार बंद.!!

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

जनसंघर्ष न्यूज नेटवर्क

पुणे :- (दि.४ फेब्रुवारी) पुणेशहरात यशदा (यशवंतराव चव्हाण विकास प्रबोधिनी) ही उच्चपदस्थ प्रशासकीय अधिकार्‍यांना प्रशिक्षण देणारी सर्वात मोठी जुनी तसेच नावाजलेली संस्था आहे. या संस्थेतील ज्येष्ठ सनदी अधिकारी तथा यशदाचे उपसंचालक डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी यांनी महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी ‘क्रांतिज्योती’ हे मॉडेल तयार केले.

२०१४ पासून हे मॉडेल त्यांनी आखले असले तरी यशदामध्ये आल्यानंतर त्याला त्यांनी अधिक उंचीवर नेले. जेथे आयएएस अधिकार्‍यांना प्रशिक्षण दिले जाते, तेथेच सरपंच महिलांना आता आर्टिफिशल इंटेलिजन्सच्या (ए.आय.) च्या माध्यमातून निर्णय क्षमतेत अधिक वेगवान आणि स्मार्ट करण्यासाठी प्रशिक्षण दिले जात आहे.

कशा प्रकारे तयार झाले मॉडेल

डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी यांच्या प्रदीर्घ प्रशासकीय सेवेच्या अनुभवातून क्रांतीज्योती हे मॉडेल संपूर्ण देशासाठी मार्गदर्शक ठरेल असेच आहे. कारण त्यांनी मागास राहिलेल्या 27 तालुक्यातील महिला सरपंचांची निवड या मॉडेलमध्ये केली.

विकासापासून दूर राहिलेल्या 27 तालुक्यांतील महिला सरपंचांना पहिल्या टप्प्यात त्यांनी प्राधान्य दिले. त्या महिला आता इतक्या सक्षम झाल्या आहेत की, त्यांनी पतिराजांच्या मदतीविना सरपंचांच्या गाडीचे स्टेअरिंग आता पूर्णपणे आपल्या हाती घेतले आहे. आदिवासी ते मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषा शिकण्याचा त्यांचा प्रवास अफलातून आहे.

यशदाच्या स्नेहा देव यांच्याकडून प्रशिक्षण

प्रथम वर्ग प्रशासकीय अधिकारी म्हणून निवृत्त झालेल्या स्नेहा अरुण देव या मूळ परभणीच्या. प्रचंड मेहनतीने त्यांनी प्रशासकीय सेवेत आपल्या कामाची वेगळी छाप पाडली. त्यामुळे त्यांना निवृत्तीनंतर डॉ. कलशेट्टी यांनी क्रांतिज्योती मॉडेलच्या प्रमुख ट्रेनर पदी नेमले.

राज्यातील प्रत्येक महिला सरपंचाला त्या आपली मुलगी मानूनच प्रशिक्षण देत आहेत. स्टेज डेअरिंग (सभा धीटपणा), कसे बोलावे, कसे राहावे, डायरी कशी लिहावी, ग्रामपंचायतीमध्ये काम करताना सभा, कार्य अहवाल, विकासकामे यावर लक्ष कसे द्यावे, त्यांच्या नोंदी कशा ठेवाव्यात याचे प्रशिक्षण महिला सरपंचांना त्या देत आहेत.

माझ्या प्रशासकीय सेवेतील हा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ होता. 2014 पासून मी यावर काम करीत होतो. सेवानिवृत्त झाल्यावर यशदामध्ये उपसंचालक म्हणून रुजू झालो आणि क्रांतिज्योती मॉडेलला अधिक गती आली. त्यातूनच या महिला सरपंच तयार झाल्या.
-डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी, उपमहासंचालक तथा संचालक, राज्य ग्रामीण विकास संस्था, यशदा, पुणे

Jan Sangharsh News
Author: Jan Sangharsh News

जन संघर्ष न्यूज लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें

Buzz4 Ai