पीएम किसान सन्मान निधीमध्ये होणार वाढ ; १२ हजार ऐवजी मिळणार १५ हजार दरवर्षाला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

जनसंघर्ष न्यूज नेटवर्क

पुणेः- केंद्र सरकार व राज्य सरकार हे शेतकऱ्यांच्या विकासासाठी कटीबद्द असून या दिशेनं अधिकचे प्रयत्न सुरू असल्याचे मुख्यमंत्र्यांकडून काल सांगण्यात आले. तसेच शेतकऱ्यांना अडचणीच्या काळात प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेमुळे फायदा होत असल्याचे या मधून दिसत आहे.केंद्र सरकार प्रमाणे राज्य सरकारही राज्यातील या योजने मधील शेतकऱ्यांना ‘नमो किसान सन्मान निधी योजनेंतर्गत’ ६ हजार रुपये देत असून लवकरच हे अर्थसहाय्य ३ हजार रुपयांनी वाढविण्यात येणार असल्याची घोषणाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आज करण्यात आली आहे.

 

प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या हस्ते भागलपूर, बिहार येथे ‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या १९ व्या हप्त्याचं वितरण आज करण्यात आले. या वितरणाचा राज्यस्तरीय कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली वनमती येथील कै. वसंतराव नाईक स्मृती सभागृहात आयोजित करण्यात आला होता यावेळी ते बोलत होते. कृषी राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, प्रभारी विभागीय आयुक्त डॉ. माधवी खोडे-चवरे, कृषी आयुक्त सुरज मांढरे, वनमतीचे प्रभारी संचालक रविंद्र ठाकरे इत्यादी जणांची यावेळी उपस्थिती होती.

नमो किसान सन्मान निधीत होणार मोठी वाढ- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पीएम किसान सन्मान निधी योजनेद्वारे देशातील शेतकऱ्यांना अडचणीच्या काळात आर्थिक मदत मिळत आहे. या योजनेंतर्गत केंद्र सरकारकडून प्रत्येक वर्षाला थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ६ हजार रुपये DBT द्वारे वितरीत करत आहे. तर राज्य सरकारच्यावतीनं ‘नमो किसान सन्मान निधी या योजनेद्वारे’ शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षाला ६ हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात येत आहे. आता राज्य सरकारच्या वतीने या निधीमध्ये ३ हजार रुपयांची वाढ करणार असून राज्य सरकारच्या वतीने ९ हजार तसेच केंद्र सरकारच्या वतीने ६ हजार असे एकुण १५ हजार रुपयांचे अर्थसहाय्य आता प्रत्येक वर्षाला योजनेतील शेतकऱ्यांना मिळणार आहेत. व त्याची अंमलबजावणी लवकरच राज्य सरकारच्या वतीने करण्यात येईल असेही मुख्यमंत्री म्हणाले.

Jan Sangharsh News
Author: Jan Sangharsh News

जन संघर्ष न्यूज लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें

Buzz4 Ai