ग्रामपंचायत म्हसोबावाडीच्या वतीनं ; आठवडे बाजाराचा शुभारंभ.!!

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

ग्रामपंचायत म्हसोबावाडीच्या वतीनं ; आठवडे बाजाराचा शुभारंभ- सरपंच राजेंद्र राऊत

जनसंघर्ष न्यूज नेटवर्क
इंदापूरः (दि.२५)आठवडी बाजार म्हणजे दर आठवड्याच्या एका विशिष्ट दिवशी व विशिष्ट स्थानी भरणारा बाजार होय. या ठिकाणी विक्रेते आपापला माल घेऊन येतात व विक्री करतात.ज्या ठिकाणी भरपूर दुकाने नाहीत व अशी दुकाने असणाऱ्या ठिकाणी जाणे गैरसोयीचे व आर्थिक दृष्ट्या परवडणारे नसते, तेथे अशा प्रकारचा बाजार भरविला जातो.भारतात जास्त करून ग्रामिण भागात अजूनही अशा प्रकारची व्यवस्था आहे.अनेक शहरातही मोजक्या ठिकाणी असा बाजार भरतो. गावातील आठवडी बाजार ही गावच्या अर्थकारणासाठी महत्त्वाची बाब आहे. यासाठी स्थानिक संस्था (नगर परिषद/ नगरपालिका) ,ग्रामपंचायत अश्या बाजाराची व्यवस्था करीत असते व त्या ठिकाणच्या सोयी सुविधा करण्यास बाध्य असते.

आठवडे बाजारात विक्रीसाठी बसलेला शेतकरी राजा

म्हसोबाचीवाडी ग्रामपंचायतीच्या वतीनं अत्यंत महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे की , गावामध्ये आठवडे बाजार यापूर्वी नव्हता म्हणून तो सुरू करण्यासाठी गावचे लोकनियुक्त सरपंच राजेंद्र राऊत यांच्याकडे हा बाजार चालू व्हावा म्हणून शेतकरी आणि विक्रेते सातत्यानं ग्रामपंचायतीकडे मागणी करत होते याचं गोष्टीची गंभीरपणे दखल घेत सोमवार दि.२४ फेब्रुवारी पासून दुपारी ४ ते संध्याकाळी ९ पर्यंत  ग्रामपंचायतीच्या वतीने परवानगी देण्यात आली आसून तो बाजार कालपासून सुरू करण्यात आला असल्याचे माध्यमांना बोलताना सरपंच राजेंद्र राऊत यांनी सांगितले. तसेच ते बोलताना पुढे म्हणाले की, या आठवडे बाजाराच्या उपक्रमामुळं गावचे अर्थकारण चांगल्या प्रकारे सुदृढ होणार आहे व शेतकरी विक्रेत्यांचा माल हा गावामध्येच विक्री होऊन त्यांना अधिकचे चार पैसे मिळणार आहेत तसेच खरेदीदारांची या उपक्रमामुळं गावातच खरेदी विक्री करण्याची सोय निर्माण झाली आहे तसेच त्यांना फळं , पालेभाज्या ,कडधान्ये व इतर गोष्टी विकत घेण्यासाठी बाहेर जावं लागणार नाही. तसेच ग्रामपंचायतीच्या वतीने अधिकच्या सुखसुविधा पुरविण्याचा प्रयत्न ग्रामपंचायतीच्या माध्यमातून करण्यात येईल.

यावेळी बोलताना सामाजिक कार्यकर्ते प्रशांत चांदगुडे म्हणाले आहेत की, सोमवार दिवसीचा आठवडे बाजार सुरू करण्यासाठी विशेष असे प्रयत्न गावचे लोकनियुक्त सरपंच राजेंद्र राऊत यांच्या माध्यमातून झाले आहेत तसेच उपसरपंच सविता मराळ , ग्रामपंचायत सदस्य – रमेश चांदगुडे , दत्तात्रय राऊत , मोहन दाभाडे , प्रमोद खंडाळे , माधुरी चांदगुडे, सुप्रिया चांदगुडे , राणी पवार, कमल पवार आणि ग्रामपंचायत अधिकारी सोनाली गवळी यांचे विशेष असे सहकार्य याकामी लाभले आहे.

Jan Sangharsh News
Author: Jan Sangharsh News

जन संघर्ष न्यूज लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें

Buzz4 Ai