जनसंघर्ष न्यूज नेटवर्क
पिंपरी-चिंचवड – पुण्यातून एक धक्कादायक बातमी आता समोर आली आहे पिंपरी चिंचवड मधील तीन मुलींनी असं काही कृत्य केलं आहे की, सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. स्वःताचा बाप मृत्यूशी झुंज देत असतानाच या तीन ही मुलींनी आपल्या बापाची संपत्ती मिळवण्यासाठी त्यांच्याकडून नको ते कृत्य करण्यात आले आहे. त्यांचा ब्रेन डेड झाल्यान आपला बाप वाचणार नाही, असे लक्षात आल्यानंतर हॉस्पिटलमध्येच संपत्ती लुटण्याचा कट त्यांच्याकडून रचण्यात आला तसेच आपल्या भावाला अंधारात ठेऊन आपल्या वडीलांचं मृत्यूपत्र तयार केले.
मृत्युपत्रावर घेतले आपल्या वडिलांच्या अंगठ्याचे ठसे
पिंपरी चिंचवड मधील एका नामांकित असणाऱ्या रुग्णालयामध्ये आपला बाप हा मृत्यूशी झुंज देत असतानाचं त्यांच्या पोटच्या तीन्ही मुलींनी रुग्णालयात भेटण्यास येऊन वडिलांच्या अंगठ्याचे ठसे चोरून बनावट मृत्युपत्रावर घेतले. पिंपळे गुरव येथे राहणाऱ्या ६५ वर्षाच्या इसमास कर्करोग आणि हृदयरोगानं ग्रासले होते. त्यामुळे त्यांना जास्त त्रास होऊ लागल्यानं दि.१४ जानेवारी रोजी त्यांच्या मुलानं पिंपरीतील नामांकित खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होतं. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. परंतू, दिवसेंदिवस त्यांची प्रकृती ही खालावतच होती .
तीन बहिणींचे कांड उघड हातात पेन देऊन सही घेण्याचा केला प्रयत्न
मागील काही दिवसांपासून आपले वडिल ब्रेन डेड झाल्यानंतर तिन्ही मुली रुग्णालयात गेल्या. तसेच रुग्णालयात भरती असल्याचं माहिती असताना सुद्धा एकदाही त्या निष्ठूर काळजाच्या तिन्ही मुली त्यांच्या वडिलांना पहायला गेल्या नाहीत परंतू वडिलांचं आत काही खरं राहिले नाही, असे लक्षात येताच तिन्ही मुलींनी त्या रुग्णालयामध्ये येरजाऱ्या घालण्यास सुरूवात केली होती. या मुली लागोपाठ ३-४ दिवस भेटायला येऊ लागल्या. दि.१९ फेब्रुवारी रोजी त्यांचा मुलगा रुग्णालयाच्या बाहेर गेला असतानाचं या तिन्ही मुली आपल्या वडिल ज्या वॉर्डमध्ये ॲडमिट आहेत तेथे गेल्या व त्यांनी केलेल्या मृत्यूपत्रावर त्यांच्या अंगठ्याचे ठसे घेण्यात आले. त्यानंतर त्यांच्या हातामध्ये पेन देऊन त्यांची सही घेण्याचा प्रयत्न करण्यात आला.

Author: Jan Sangharsh News
जन संघर्ष न्यूज लाईव्ह