म्हसोबावाडी येथे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा-2 अंतर्गत ; घरकूल मंजुरीच्या पत्राचं वाटप.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

जनसंघर्ष न्यूज नेटवर्क

 इंदापूरः- प्रधानमंत्री आवास योजनेच्या ग्रामीण भागासाठी टप्पा-२ मध्ये राज्यात २० लाख लाभार्थ्यांना घरकुल मंजुरीचे पत्र तर १० लाख लाभार्थ्यांना घरकुलासाठीचा प्रथम हप्ता हा वितरण करण्यात आला. तसेच या कार्यक्रमाचे आयोजन हे पुण्याधील बालेवाडी शिवछत्रपती क्रीडा संकुलामध्ये शनिवार (दि.२२ ) रोजी अमित शहा यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

यावेळी बोलताना मंत्री जयकुमार गोरे म्हणाले की, राज्यात सन २०२४ -२०२५ या वर्षामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून जवळजवळ २० लाख घरकुल मंजुरी देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी केंद्र सरकारकडे विशेष असा पाठपुरावा करण्यात आला होता. २० लाख घरे बांधण्यासाठी ग्रामविकास विभागाला १०० दिवसांचा विशेष असा कृती कार्यक्रम आखून दिला आहे. तसेच राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने २० लाख घरकुलांचं बांधकाम वेळेत पूर्ण करण्यासाठी ग्रामविकास विभागाच्या राज्यस्तर ते ग्रामस्तरापर्यंत सर्व यंत्रणांनी घरकुल मंजुरी तसेच प्रथम हप्ता वितरणासाठी जागा उपलब्धता, लाभार्थ्यांचे बँक खाते उघडणे या साठीची विशेष अशी मोहीम हाती घेण्यात आली आहे.

याच पार्श्वभुमीवर ग्रामपंचायत कार्यालय म्हसोबाचीवाडी,तालुका- इंदापूर,जिल्हा-पुणे.येथे ग्रामपंचायत कार्यालयाकडून प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना प्रमाणपत्राचं वाटप करणेबाबतचा कार्यक्रम गावचे लोक नियुक्त सरपंच श्री राजेंद्र महादेव राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी उपसरपंच सविता अशोक मराळ, सदस्या सौ माधुरी श्रीकांत चांदगुडे ग्रामपंचायत अधिकारी श्रीमती. सोनाली गवळी मॅडम, शिक्षक प्रतिनिधी श्री शिंदे सर, अंगणवाडी सेविका वंदना पवार मॅडम, निवृत्त शिक्षक हौशीराम चांदगुडे यांच्यासह घरकुल लाभार्थी उपस्थित होते.

Jan Sangharsh News
Author: Jan Sangharsh News

जन संघर्ष न्यूज लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें

Buzz4 Ai