छावा चित्रपटाच्या निर्माता,दिग्दर्शकावर गुन्हे दाखल करावेत ; गणोजी शिर्केंच्या वंशजांची पत्रकार परिषदेत मागणी.!!

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

जनसंघर्ष न्यूज नेटवर्क

पुणे: – (दि.२१)छावा’ चित्रपटाच्या दिग्दर्शक,निर्मात्यावर गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी गणोजी शिर्के व कान्होजी शिर्केंच्या वंशजांनी आज दि.21 रोजी पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेऊन केली आहे. या चित्रपटामध्ये गणोजी शिर्के व कान्होजी शिर्के यांच्या व्यक्तिरेखेचं चुकीचा इतिहास या चित्रपटात मांडण्यात आला असल्याचा थेट आरोपच त्यांच्या वंशजांकडून करण्यात आला आहे.

छावा हा चित्रपट शंभूराजे यांच्या संपूर्ण जीवनावर आधारित असा एक ऐतिहासिक चित्रपट असून, या चित्रपटामध्ये गणोजी शिर्के व कान्होजी शिर्के यांना विश्वास घातकी व नकारात्मकतेच्या भूमिकेत दाखवण्यात आला असल्याचा आरोप वंशजांकडून करण्यात आला आहे. शिर्के कुटुंबानं छावा चित्रपटाच्या दिग्दर्शक निर्मात्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.

छावा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीचं वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. काही इतिहास संशोधकांनी तसेच समाजातील विविध संघटनांनी चित्रपटातील ऐतिहासिक संदर्भ चुकीच्या पद्धतीने सादर केले गेले असल्याचा गंभीर असा आरोप केला आहे.

या उद्भवलेल्या वादामुळे, महाराष्ट्र सरकार किंवा चित्रपटाचे निर्माते यावरती काय स्पष्टीकरण देणार ? तसेच या मागणीवर काय कारवाई होणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आता लागून राहिले आहे.

गणोजी शिर्के आणि कान्होजी शिर्केंच्या वंशजांकडून मत व्यक्त आहे की, संभाजी राजेंच्या सख्ख्या मेहूण्यांच्या इतिहासाचं चुकीच्या केलेल्या सादरीकरणामुळं समाजात संभ्रम निर्माण होत आहे. तसेच छावा या चित्रपटामध्ये ऐतिहासिक असणाऱ्या खऱ्या गोष्टींची छेडछाड करण्यात आली आहे आणि गणोजी शिर्के व कान्होजी शिर्के यांना खलनायक म्हणून दाखवण्यात आले आहे जे की ऐतिहासिकदृष्ट्या संपूर्णपणे चुकीच्या पद्धतीचे आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या निर्माता व दिग्दर्शकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांच्या वंशजांकडून करण्यात येत आहे.

Jan Sangharsh News
Author: Jan Sangharsh News

जन संघर्ष न्यूज लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें