जनसंघर्ष न्यूज नेटवर्क
पुणेः- (दि.५) पुणे आणि बंगळूर दरम्यानच्या प्रवासाला आता एक नवीन आणि गतिशील मार्ग मिळाला आहे, जो प्रवाशांचा प्रवास सुलभ आणि जलद करेल. पुणे-बंगळूर ग्रीनफील्ड कॉरिडॉरचा डीपीआर (डिटेल्ड प्रोजेक्ट रिपोर्ट) पूर्ण झाला आहे आणि तो राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या मुख्यालयाकडे मंजुरीसाठी पाठविला आहे. प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम यांनी ही माहिती दिली आहे.
नवीन मार्गाची विशेषता काय असणार आहे ?
पुणे-बंगळूर ग्रीनफील्ड कॉरिडॉर हा पूर्णतः नवा द्रुतगती मार्ग असेल, ज्यामुळे प्रवासाचा वेळ चार ते पाच तासांनी कमी होईल. सध्याचा पुणे-बंगळूर महामार्ग ८३८ किलोमीटर लांबीचा असून, नवीन ग्रीनफील्ड कॉरिडॉर ७४५ किलोमीटर अंतराचा असेल, यामुळे ९३किलोमीटरचे अंतर कमी होणार आहे. हा मार्ग वारवे बुद्रुकपासून सुरू होऊन सहापदरी असेल आणि संपूर्णपणे डांबरी असणार आहे.
यामध्ये विशेष सुविधा काय असणार
विमानाची धावपट्टी: पुणे आणि बंगळूरजवळ पाच किलोमीटरची धावपट्टी असेल, जी आपत्कालीन परिस्थितीत विमान उतरवण्यासाठी वापरली जाईल. हा राज्यातील पहिला राष्ट्रीय महामार्ग असेल ज्यावर विमानाची धावपट्टी असेल.
टोलनाक्यांपासून गावांमध्ये जाण्यास रस्ते: मार्गावर विविध टोलनाक्यांपासून गावांमध्ये जाण्यासाठी रस्ते असतील.
प्रसाधनगृहे, मुलांसाठी उद्याने, हॉटेल: या मार्गावर प्रसाधनगृहे, मुलांसाठी उद्याने आणि हॉटेलसह अनेक सुविधा असतील.
वृक्षारोपण: रस्त्याच्या दोन्ही बाजूला वृक्षारोपण केले जाईल, ज्यामुळे प्रदूषणाची पातळी कमी होईल.
आर्थिक आणि प्रशासकीय बाबी
एकूण खर्च: या नवीन मार्गासाठी सुमारे 40 हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे.
भूसंपादन: मंजुरी मिळताच भूसंपादन प्रक्रियेला सुरुवात होईल आणि भूसंपादन पूर्ण झाल्यावर अवघ्या दोन वर्षांत नवीन आठपदरी मार्ग बांधून तयार होईल.
वाहनांचा वेग: या मार्गावरून वाहने ताशी 120 किलोमीटर वेगाने धावतील.
होणारा नवीन महामार्ग पुणे, सांगली, सातारा आणि कोल्हापूरसह इतर शहरांमधून थेट जाणार नाही, यामुळे प्रवाशांना अधिक सुलभ आणि जलद प्रवासाची सुविधा मिळणार आहे.
यामध्ये नवीन काय आसणार आहे ?
पुणे-बंगळूर ग्रीनफील्ड कॉरिडॉर: नवीन द्रुतगती मार्गाची तयारी पुर्ण
पुणे-कोल्हापूर प्रवास आता अधिक जलद आणि सुलभ
४० हजार कोटींच्या प्रकल्पातून पुणे-बंगळूर दरम्यानचे अंतर कमी होणार आहे.
पुणे-बंगळूर मार्ग: विमानाची धावपट्टी असलेला राज्यातील पहिलाच राष्ट्रीय महामार्ग असणार आहे तसेच पुणे-बंगळूर ग्रीनफील्ड कॉरिडॉर: प्रदूषण कमी करणारा आणि रोजगाराची संधी देणारा मार्ग असणार आहे

Author: Jan Sangharsh News
जन संघर्ष न्यूज लाईव्ह