जेलमधून गुन्हेगारांना बाहेर काढण्यासाठी वकिलांनी बनवली बनावट जामीनदारांची संघटना ; पुणे पोलिसांनी लावला छडा.!!

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

जनसंघर्ष न्यूज नेटवर्क

पुणे :-(दि.३फेब्रुवारी )वेगवेगळ्या गंभीर गुन्ह्यांमध्ये गुन्हेगारांना अटक केल्यानंतर त्यांची रवानगी कारागृहात होते. पण गुन्हेगारांना जामीन मिळवण्यासाठी लोक घाबरतात, याचा फायदा घेऊन काही धूर्तांनी न्यायालयातून जामीन मिळवून देण्यासाठी वकीलांच्या मदतीने बनावट जामीनदारांची संघटना उभी केली होती. हे लोक गुन्हेगारांच्या नातेवाईकांशी आर्थिक व्यवहार करून, बनावट कागदपत्रे तयार करत होते आणि मग गुन्हेगारांना बाहेर सोडत होते. पण पुणे पोलिसांनी ही संघटना उद्ध्वस्त केली आहे.

पुणे पोलिसांनी दोन वकिल यांच्यासह पाच जणांना अटक केली आहे, अशी माहिती पुणे शहर पोलीस उपआयुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांनी दिली. अटक करण्यात आलेल्या वकिलांची नावे आहेत – अ‍ॅड. असलम गफुर सय्यद (वय ४५, रा. वैदवाडी, हडपसर) आणि अ‍ॅड. योगेश सुरेश जाधव (वय ४३, रा. हडपसर). त्यांचे साथीदार जे बनावट कागदपत्रे तयार करत होते, त्यांची नावे आहेत – दर्शन अशोक शहा (वय ४५, रा. सोलापुर बाजार, पुणे), पिराजी उर्फ चंद्रकांत मारुती शिंदे (वय ६०, रा. भारतमाता चौक, मोशी), गोपाळ पुंडलीक कांगणे (वय ३५, रा. मोरवाडी, पिंपरी) आणि संतोषकुमार शंकर तेलंग.

पोलिसांच्या माहितीनुसार, हे रॅकेट बनावट जामीनदारांच्या आधारकार्ड, रेशन कार्ड इत्यादी कागदपत्रांमध्ये बदल करून तयार करत होते. त्यात खोटी सही आणि शिक्यांचा वापर करून न्यायालयासमोर खरे असल्याचा दावा करीत होते. वानवडी पोलीस ठाण्यातील तपास पथकांना या बनावट जामीनदारांच्या रॅकेटबाबत गोपनीय माहिती मिळाली आणि त्यानुसार पोलिसांनी ही मोठी कारवाई केली.

Jan Sangharsh News
Author: Jan Sangharsh News

जन संघर्ष न्यूज लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें