जनसंघर्ष न्यूज नेटवर्क
पुणेः- (दि.२२) दिव्यांग व्यक्तींना अपंगत्व प्रमाणपत्र मिळविणसाठी जिल्हयाच्या ठिकाणी प्रवास करावा लागू नये, यासाठी राज्य सरकारच्या वतीने महत्त्वपुर्ण निर्णय घेण्यात आला आहे. त्यामध्ये आता जिल्हयाच्या ठिकाणी दिव्यांग प्रमाणपत्र न देता त्यांना दिव्यांग प्रमाणपत्र देण्याची सुविधा यापुढे थेट तालुका स्तरावरच उपलब्ध करून देण्यात येणार आहे.सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने याबाबतचे आदेश दिले असून, प्रत्येक जिल्ह्यातील १०० खाटा आसणाऱ्या उपजिल्हा रुग्णालयांमध्ये दिव्यांग प्रमाणपत्र देण्याची सुविधा यापुढे उपलब्ध होणार आहे. यासाठी तज्ज्ञांची समिती स्थापन करण्यात येणार आहे.
सरकारकडून दिव्यांग बांधवांसाठी अधिकच्या सुविधा देण्याचा होणार प्रयत्न
राज्य सरकारच्या वतीने दिव्यांग बांधवांसाठी विविध सेवा सुविधा देण्याचा प्रयत्न सातत्याने सुरू आहे. या निर्णयामुळे दिव्यांग व्यक्तींच्या जीवनात सकारात्मक बदल होणार आहे तसेच त्यांना सरकारी योजनांचा लाभ घेणे सोपे होणार आहे. महिन्याच्या ठरावीक दिवशी घेण्यात येणाऱ्या या शिबिरामुळं दिव्यांग प्रमाणपत्रांसाठी प्रलंबित अर्ज लवकर निकाली निघणार आहेत. तसेच यामुळे प्रशासनाची कार्यक्षमता वाढणार आहे तसेच लाभार्थ्यांना वेळेवर सेवा सुविधा मिळणार आहेत.
सरकारकडून समिती स्थापन करण्याचे दिले निर्देश
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने सर्व उपसंचालक, आरोग्य सेवा परिमंडळ, जिल्हा शल्यचिकित्सक, तसेच जिल्हा रुग्णालयांना याबाबतचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. तसेच या समितीत विविध क्षेत्रातील तज्ज्ञांचा समावेश करण्यात येणार आहे.
दिव्यांग असणाऱ्या व्यक्तींना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. पूर्वी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी सर्व दिव्यांग व्यक्तींना जिल्हयाच्या ठिकाणी जावे लागत होते. त्यामुळे त्यांचा वेळ आणि पैशांचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत होता. हि बाब लक्षात घेत राज्य सरकारच्या वतीने या घेतलेल्या निर्णयामुळे आता ती दूर होणार आहे.

Author: Jan Sangharsh News
जन संघर्ष न्यूज लाईव्ह