वाल्मिक कराडचा फास आवळला;सीआयडीकडून पत्नीची कसून चौकशी.!!

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

जनसंघर्ष न्यूज प्रतिनिधी

बीडः केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर राजकीय वातावरण तापलं आसल्याने. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणी एसआयटी स्थापन करण्याची घोषणा केली होती. मात्र,तरीही विरोधकांचं समाधान झालं नव्हते.

त्यामुळे गृहमंत्र्यांना हिवाळी अधिवेशनातच या घटनेचा तपास महाराष्ट्र पोलिसांकडून सीआयडीकडे वर्ग करण्यात आल्याची घोषणा करावी लागली. त्यानंतर आता तपासानं वेग घेतला असून लवकरच या निघृण हत्येपाठीमागच्या मास्टरमाइंड याला अटक करण्यात येईल असं बोललं जात आहे.

सरकार तसेच पोलिसांवर बीड जिल्ह्यातील जनता व सर्व राजकीय नेत्यांचा दबाव वाढतोच आहे. यातच आता या प्रकरणात मोठी माहिती समोर आली आहेयाप्रकरणी गंभीर आरोप होत असलेले आणि फरार अशा वाल्मिक कराड यांच्याभोवतीचा फास पोलिस आणि सीआयडीकडून आवळला जात आहेत. दुसरीकडे कराड यांच्यावर पोलिसांकडून खंडणीचाही गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांच्या शोधासाठी आता पोलिसांकडून दिवस रात्र शोध मोहीम सुरू झाली आहे. सीआयडी पोलिसांकडून शुक्रवार ( दि.२७ ) रोजी वाल्मिक कराड यांच्या पत्नी मंजिली यांची कसून चौकशी केल्याची माहिती आता समोर येत आहे.

बीड शहर पोलीस स्टेशनमध्ये सीआयडी पथकाकडून जवळ जवळ दोन ते अडीच तास मंजिली कराड यांची चौकशी करण्यात आली आसून त्यानंतर त्यांना सोडून देण्यात आलं आहे. सीआयडी पोलिसांनी हा चौकशीचा भाग असल्याचे सांगितलंय.

Jan Sangharsh News
Author: Jan Sangharsh News

जन संघर्ष न्यूज लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें

Buzz4 Ai