जनसंघर्ष न्यूज नेटवर्क
पुणेः पुण्यामधून धक्कादायक घटना समोर आली आहे, दहावीमध्ये शिकणाऱ्या एका नामांकीत शाळेतील १७ वर्षीय विद्यार्थ्याच्या अज्ञानाचा फायदा घेत त्याला स्वतःबरोबर शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडणाऱ्या एका २७ वर्षीय शिक्षिकेला खडक पोलिसांनी अटक केले आहे.गंज पेठेतील एका नामांकित शाळेत हा प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी संबंधित शिक्षिकेवरती पोलिसांकडून लैंगिक अपराधांपासून बालकांचं संरक्षण अधिनियम (पॉक्सो) कायद्याच्या ॲक्टनुसार तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खडक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदरचा प्रकार हा शाळेच्या आवारात शुक्रवार रोजी उघडकीस आला आहे. पीडित अल्पवयीन मुलगा हा भवानी पेठ परिसरात राहतो. तो शुक्रवार रोजी शाळेत दहावीच्या प्रिलियम परीक्षेसाठी आलेला होता. सदरची शिक्षिका ही ह्या शाळेमध्ये शिक्षिका म्हणून काम करत आसून ती धानोरी येथे राहते.मुलं शाळेत असताना त्यांची पालकत्वाची जबाबदारी ही शिक्षक या नात्याने तिच्यावर असते हे माहीत असताना देखील अल्पवयीन विद्यार्थ्याला तिने आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले. आरोपी शिक्षिकेनं तिच्या सोबत शाळेच्या आवारातच शारीरिक संबंध ठेवण्यासाठी भाग पाडले. आणि त्या मुलाचे लैगिक शोषण केलं.
संबंधित शाळेच्या व्यवस्थापनाला याची माहिती मिळाल्यानंतर या घटनेशी संबंधित असणाऱ्या शिक्षिकेवर शाळेच्या वतीनं गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच तिला अटक सुध्दा करण्यात आली आहे. तसेच या घटनास्थळी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी भेट दिली आहे. सदरच्या घटनेचा अधिकचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

Author: Jan Sangharsh News
जन संघर्ष न्यूज लाईव्ह
Post Views: 268