शासनाच्या नक्षल आत्मसमर्पण योजनेला प्रतिसाद ; तब्बल ७ लाखांचं बक्षीस असलेल्या , जहाल माओवाद्यानं केलं आत्मसमर्पण.!!

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

जनसंघर्ष न्यूज प्रतिनिधी- संजय वैशंपायन

छत्तीसगड : सात लाखांचे बक्षीस असलेल्या जहाल माओवाद्याने चळवळीतील त्रासाला कंटाळून जिल्हाधिकारी प्रजित नायर व पोलीस अधीक्षक गोरख भामरे, अप्पर पोलीस अधीक्षक नित्यांनंद झा यांच्यासमोर आत्मसमर्पण केले. देवा उर्फ अर्जुन उर्फ राकेश सुमडो मुडाम, (वय २७, रा. गुंडम सुटबाईपारा, पोस्ट- बासागुडा, तहसील- ऊसुर, पो. स्टे. पामेड, जिल्हा- बिजापुर (छत्तीसगड) हे आत्मसमर्पीत नक्षलवाद्याचे नाव आहे.

देशातील माओवादी चळवळीला प्रतिबंध व्हावा व अधिकाधिक माओवाद्यांनी आत्मसमर्पण करुन त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याकरिता तसेच त्यांचे सामाजिक व आर्थिक पुनर्वसन व्हावे या उद्देशाने महाराष्ट्र शासनामार्फत नक्षल आत्मसमर्पण योजना राबविली जात आहे.

आत्मसमर्पित माओवादी देवा ऊर्फ अर्जून ऊर्फ राकेश याचे मुळ गाव- बिजापूर जिल्हयातील अतिनक्षल प्रभावित भागात असल्याने त्याचे गावात पूर्वीपासूनच सशस्त्र गणवेशधारी माओवाद्यांचे येणे जाणे होते. माओवाद्यांच्या भुलथापा व प्रलोभनांना बळी पडून त्यांच्या निर्देशाप्रमाणे लहानपणापासूनच तो नक्षल चळवळीत सहभागी होवून बाल संघटनमध्ये काम करीत होता.

२०१४ मध्ये तो पामेड दलममध्ये (दक्षीण बस्तर) भरती झाला व शस्त्र हातात घेतले. पामेड दलममध्ये ६ महिने काम केल्यानंतर २०१४ च्या अखेरीस त्याने अबुझमाड परिसरात अडीच महिन्याचे प्रशिक्षण घेतले. ते पूर्ण केल्यानंतर त्याला २०१५ मध्ये माओवाद्यांचे बस्तर भागातून महाराष्ट्र- मध्यप्रदेश-छत्तीसगड झोनमध्ये पाठवले. सुरुवातीला त्याने दलम सदस्य म्हणून २०१५ ते १६ पर्यंत तांडा दलम व २०१६ ते १७ पर्यंत मलाजखंड दलम मध्ये काम केले.आणखीही काही जहाल नक्षलवादी येत्या काळात मूळ प्रवाहात सामील होऊ शकतात अशी आशा व्यक्त केली जात आहे.

Jan Sangharsh News
Author: Jan Sangharsh News

जन संघर्ष न्यूज लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें

Buzz Open / Ai Website / Ai Tool