जनसंघर्ष न्यूज नेटवर्क
पुणे :- मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजने अंतर्गत लाडकी बहीण योजनेतील प्रत्येक कुटुंबातील एका महिलेला वर्षातून तीन गॅस सिलिंडर मोफत देण्याची राज्यसरकारची योजना आहे. त्यानुसार लाखो मुख्यमंत्री लाडक्या बहिणी याचा लाभ घेत आहेत. बऱ्याच जिल्ह्यातील जवळपास लाखो शिधापत्रिकाधारकांपैकी काही कुटूंब ही मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या लाभापासून दूरच आहेत. त्यामागील प्रमुख कारणे म्हणजे, त्या कुटुंबातील गॅस कनेक्शन पुरुषाच्या नावे आहे. या पार्श्वभूमीवर आता त्यांना जवळच्या गॅस एजन्सी किंवा वितरकाकडे जाऊन साध्या कागदावर अर्ज करून आधारकार्ड जोडून दिल्यास त्यांना कनेक्शनवरचं नाव बदलून मिळणार आहे. त्यानंतर त्यांना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेतून दरवर्षी तीन गॅस सिलिंडर मोफत मिळविता येणार आहेत. सुरवातीला संबंधित लाभार्थींना संपूर्ण पैसे द्यावे लागतील, त्यानंतर काही दिवसांनी शासनाचं अनुदान त्या लाभार्थींच्या बँक खात्यावर जमा होणार आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील महिलांना अन्नपुर्णा योजनेतून वर्षातून ३ घरगुती गॅस सिलिंडर मोफत दिले जात आहेत, परंतू बहुतांस पुरुषांच्या नावावर गॅस सिलिंडरचं कनेक्शन असल्याने हजारो महिलांना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ यामुळे मिळालेला नाही.त्यामुळे जवळील आसणाऱ्या गॅस एजन्सीकडे किंवा आपण ज्या ठिकाणी गॅस घेत आहात, त्याठिकाणी केवळ साध्या कागदावर अर्ज करून त्याबरोबर महिलेचे आधारकार्ड झेरॉक्स देऊन महिलेच्या नावे कनेक्शन बदलून घेता येणार आहे.
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या लाभासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी कुटुंबातील महिलेच्या नावे गॅस कनेक्शन आवश्यक आहे. अनेक जिल्ह्यातील बहुतांस कुटुंबातील गॅस कनेक्शन पुरुषांच्या नावे असल्याने त्या लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ घेता येत नाही. त्यामुळे त्यांनी जवळील गॅस एजन्सीच्या कार्यालयात जाऊन साध्या कागदावर अर्ज करून कनेक्शन महिलेच्या नावे करून घ्यावे.

Author: Jan Sangharsh News
जन संघर्ष न्यूज लाईव्ह
Post Views: 236