जनसंघर्ष न्यूज नेटवर्क
खेड :- पुणे जिल्हयातील राजगुरूनगर (खेड) येथे भयानक घटना घडली आहे, २ लहान आसणाऱ्या चिमुरड्या मुलींवर एका नराधम परप्रातीय वेटरनं अत्याचार करून त्यांना एका खोलीमधील पाणी भरण्याच्या बॅरलमध्ये त्यांचा निर्दयीपणे खून करून त्यामध्ये झाकून ठेवल्याचा भयानक असा माणुसकीला काळिमा फासणारा प्रकार राजगुरुनगर (खेड) शहरातील वाडा रस्त्यावरील एका मोठ्या वर्दळीच्या गल्लीत गुरुवार दिनांक २६ डिसेंबर रोजी उघडकीस आला आहे.
एका आठ वर्षीय व एक नऊ वर्षांच्या या चिमुरड्या मुली ज्या ठिकाणी राहायला होत्या, त्या जवळचं असलेल्या एका बियर बारमध्ये काम करत असलेल्या ६ परप्रांतीय मुलांच्या खोलीमध्ये पोलिसांना या दोन्ही लहान मुलींचे मृतदेह सापडल्याचं स्थानिकांडून सांगितले जात आहे.
या दोनही मुली २५ डिसेंबर रोजी दुपारी खेळताना अचानक गायब झाल्यावर त्यांचा शोध घेण्यात आला; मात्र त्यांचा तपास लागला नाही त्यामुळे त्यांच्या पालकांनी त्याच दिवशी संध्याकाळी खेड पोलिस ठाण्यात त्या हरवल्या असल्याची तक्रार दिली होती. या दोन्ही मुली सख्या बहिणी असून बाहेरगावाहून मोलमजुरी करण्यासाठी आलेल्या कुटुंबातील असल्याचे समजते आहे. तसेच हरवलेल्या मुलींचा तपास करताना खबऱ्या कडून माहिती मिळाल्यानंतर खेड पोलीसांनी मुलींच्या कुटुंब राहत असलेल्या चाळीजवळच्या बारमध्ये काम करत आसणाऱ्या परप्रांतीय मुलांच्या खोलीची झडती घेतली असता. केवळ गुडघाभर पाणी असलेल्या एका बॅरलमध्ये भरून ठेवलेल्या दोन्ही मुली याठिकाणी मृतअवस्थेत मिळून आल्या आहेत असे सांगण्यात आले आहे. तसेच या दोन्ही मुलींचे मृतदेह चांडोली ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी पाठवण्यात आले असून हरवलेल्या तक्रारीचा तपास करत असताना या दोन्ही मुली मयत स्वरूपात मिळून आल्या आहेत. या घटनेचा अधिकचा तपास सुरू असल्याचे, पोलिस निरिक्षक प्रभाकर मोरे यांनी माध्यमांना सांगितले. तसेच त्यांच्यावर अत्याचार झाल्याबाबत लगेच सांगता येणार नाही असेही ते बोलताना म्हणाले आहेत.
राजगुरुनगर (खेड) येथील धनराज बार मधील वेटरनं हे दोन्ही खून केले असून पहाटेच्या सुमारास ४ वाजताच्या दरम्यान पोलिसांकडून पुण्यातील एका लॉज मध्ये त्याला अटक करण्यात आले आहे. तसेच संशयित आरोपी हा ५० ते ५५ वर्षाचा असल्याचा पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. तसेच सदरचा गुन्हा हा गंभिर स्वरूपाचा असल्यानं पोलिसांनी लगेच माहिती देण्यास नकार दिला आहे. मुलींच्या आईचं व खूनी वेटरचं प्रेमसंबंध जुळले होते. त्यातून वेटरने हा खुन केला असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.
सदरील आरोपी वरच्या मजल्यावर राहत होता. मोठी असणारी मुलगी वरती गेली असता तिच्यावर आरोपी बळजबरी करण्याचा प्रयत्न करतो होता. त्यामुळे ती मोठ्यानं ओरडल्याचा आवाज आला म्हणुन लहान मुलगी धावत वरती गेली. व तिने समोरील दृष्य पाहीले म्हणून आपल बिंग फुटलं म्हणून त्या लहान मुलीला बेडरूममध्ये कोंडले व त्यानंतर मोठया मुलीला समजावत असताना त्याच्याकडून तिचा खून झाला. हे दुसरीला समजले असल्याने तिला सुद्धा आरोपीने ठार केले. व त्यानंतर दोन्ही बहिणींचे मृतदेह खोली मधील आसणाऱ्या पाण्याच्या बॅरल मध्ये टाकून तो पळून गेला.अत्याचार झाला की नाही याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही पोस्टमार्टम अवाहलानंतर ते समोर येईल असे पोलिसांचे म्हणणे आहे.

Author: Jan Sangharsh News
जन संघर्ष न्यूज लाईव्ह