दादाचा वादा पुर्णत्वाकडं , वाघळवाडीत उभारण्यात येणाऱ्या ; १०० बेडच्या शासकीय रुग्णालयाला केली, ७८ कोटी निधीची तरतूद.!!

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 जनसंघर्ष न्यूज नेटवर्क

बारामती :- बारामती  एमआयडीसी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय महाविद्यालयाचं जागेअभावी प्रलंबित राहिलेलं शंभर बेडचं रुग्णालय अखेर सोमेश्वर जवळील वाघळवाडी गावामध्ये होणार आहे. सदरच्या शासकीय रुग्णालयाला वाघळवाडी येथील ग्रामस्थांनी १० एकर गायरान जमिन उपलब्ध करून देण्याचा निर्णय एकमताने ग्रामसभेत घेतला आणि त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुढील परवाणग्यांची सूत्रे त्वरित हलविली. आणि सरकारच्या पाहणी समितीनं सदर गायरान जमिनीवर शिक्कामोर्तब केले असून, जिल्हाधिकारी कार्यालयाची परवानगी मिळताच त्वरीत काम सुरू होणार आहे.
लोकसभा निवडणुकी अगोदर अजित पवार यांनी सोमेश्वर भागात सुसज्ज असे १०० बेडचं हॉस्पिटल करण्याचा शब्द तेथील नागरिकांना दिला होता. त्यानुसार सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांच्याशी चर्चा करून २ दिवसांत शासन निर्णय काढला आणि तब्बल ७७ कोटी ७९ लाख रुपये निधीची तरतूद करत ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिनिस्त १०० बेडचं रुग्णालय, सोमेश्वर-वाघळवाडी’ अशी मंजुरी आणली. एकूण रक्कमेपैकी बांधकामासाठी ६४ कोटी ४८ लाख रुपये खर्चास १ ऑक्टोबरला वैद्यकीय शिक्षण विभागाने प्रशासकीय मंजुरी सुद्धा दिली होती.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ग्रामपंचायतीचे पदाधिकारी आणि ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने समक्ष भेटून पटवून दिले. पवार यांनी तत्काळ अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के यांना सूचना केल्या. नुकतेचं डॉ.म्हस्के, प्रशासकीय अधिकारी नंदकुमार कोकरे, वैद्यकीय अधिक्षक अमोल शिंदे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता आर. एम.मुखेकर यांच्या पथकानं जागेची पाहणी केली आणि सरकारी निकषांनुसार जागा योग्य असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिली. यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुढील कार्यवाही करण्याच्या सूचना सबंधित अधिकाऱ्यांना दिल्या असून त्यामुळे सुसज्ज असे हॉस्पिटल उभारणीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. त्यामुळं सोमेश्वर पंचक्रोशीतील नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण पहावयास मिळत आहे. तसेच काही नागरिकांनी माध्यमांना बोलताना सांगितले की, दादांनी एखादया गोष्टीचं आश्वासन दिलं तर ते पुर्ण केल्या शिवाय शांत बसतच नाहीत तसेच दादाचा वादा लाभ अन बळ हे वाक्य त्यांच्या बाबत तंतोतंत खर ठरतं आहे. कारण ते सार्वजनिक लोकोपयोगी कामं त्वरित मार्गी लावतात ही त्यांची खासियत आहे.
Jan Sangharsh News
Author: Jan Sangharsh News

जन संघर्ष न्यूज लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें

Buzz4 Ai