जनसंघर्ष न्यूज नेटवर्क
बीड – परळी तालुक्यातील अस्वलंबा येथील ऊसतोड मजूर विकास बाळासाहेब जोगदंड (वय 28 वर्षे) हा इसम झोपेत असताना त्यांच्याच गावातील मुकादम श्रीकृष्ण विठ्ठल ढाकणे (वय 47 वर्षे) याने डोक्यात दगड घालून त्याचा निर्दयीपणे खून केल्याची घटना कर्नाटक राज्यात घडली आहे.
घटप्रभा पोलिस व घटनास्थळवरील मिळालेल्या माहितीनुसार मुकादम श्रीकृष्ण ढाकणे हा आजारी असल्याने त्यास विकास जोगदंड याने उपचारासाठी दवाखान्यात आणले होते. दवाखान्यात दाखल करून जोगदंड दवाखान्याबाहेर उभारण्यात आलेल्या जगद्गुरू गुरु सिद्धेश्वर मूर्ती जवळ रात्री 11:30 वाजताच्या सुमारास झोपला होता. रात्री श्रीकृष्ण ढाकणे हा दवाखान्या बाहेर आला आणि काही कळायच्या आतच विकास जोगदंडच्या डोक्यात चाळीस किलो पेक्षा मोठा दगड घातला. त्यानंतर विकासच्या छातीवर बसून दगडाने त्याचे तोंड व डोके ठेचू लागला. हे दृष्य पाहून दवाखान्याच्या सुरक्षा रक्षकाने धाव घेत ढाकणे याला पकडले आणि घटप्रभा पोलिसांना माहिती दिली. ढाकणे याला पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.मृताचे वडील बालासाहेब मारुती जोगदंड यांनी घटप्रभा पोलिसांत फिर्याद दिली आहे. पोलिस निरीक्षक एच.डी.मुल्ला यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक एस. आर. कणवी अधिक तपास करत आहेत.

Author: Jan Sangharsh News
जन संघर्ष न्यूज लाईव्ह
Post Views: 467