जनसंघर्ष न्यूज नेटवर्क
शिरवळ :- छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या शिरवळ नगरी जवळील शिंदेवाडी गावच्या हद्दीत प्रस्तावित असणाऱ्या कृष्णा विश्वविद्यापीठाच्या माध्यमातून कृष्णा मेडिकल कॉलेज तथा हॉस्पिटल तसेच टेक्निकल इंजिनिअरिंगच्या निर्माण होणाऱ्या इमारतींचा भूमिपूजन सोहळा रविवार दिनांक २२ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजून ११ मिनिटांनी पार पडला या कार्यक्रमाचे भूमिपूजन माननीय डॉक्टर सुरेश भोसले यांच्या शुभहस्ते व माननीय आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ गौरवी भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.
भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडल्यानंतर कृष्णा विश्व विद्यापीठाचे अध्यक्ष -मा डॉक्टर सुरेश भोसले यांचं भाषण झालं यामध्ये त्यांनी या कॉलेजचे निर्मिती का करायची आहे याचा सविस्तर मुद्दे आपल्या भाषणात मांडले यावेळी बोलताना ते म्हणाले की सहकार महर्षी माननीय जयवंतराव भोसले यांनी या कृष्णा विश्व विद्यापीठाचे मुहूर्तमेढ रोवली व त्यांनी या संस्थेच्या माध्यमातून अर्थकारण न करता समाजकारण करण्याचं काम केलं व समाजाला उपयोगी पडेल असे काम केली त्यामुळे एखाद्या गरीब रुग्णांकडे पैसे नसले तरी आमच्या या कृष्ण विद्यापीठाच्या हॉस्पिटलमध्ये आम्ही मोफत उपचार केले आहेत व पुढे सुद्धा आमची परंपरा हे डॉक्टर अतुलबाबा भोसले व श्री विनायकराव भोसले चालवतील याची मला खात्री आहे.
त्यानंतर विविध मान्यवरांची भाषणे यावेळी पार पडली त्यानंतर शेवटचे भाषण आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले यांचं झालं यावेळी ते बोलताना म्हणाले की ,मला कराडच नव्हे तर संपूर्ण सातारा जिल्ह्याचा कायापालट करण्याचं काम या मेडिकल कॉलेजच्या माध्यमातून करायचं आहे तसेच मी शिरवळ व शिरवळ पंचक्रोशीतील आणि शिंदेवाडी येथील नागरिकांना शब्द देतो की, ज्यावेळेस या मेडिकल कॉलेजची निर्मिती होईल त्यावेळी पहिले प्राधान्य हे ज्यांनी संस्थेला जमीन दिली आहे व या पंचक्रोशीतील नागरिकांना या संस्थेच्या माध्यमातून रोजगार देण्याचे काम करण्यात येईल त्यामुळे कोणीही चिंता करण्याचं काही एक कारण नाही.तसेच ते पुढे बोलताना म्हणाले की आमच्या संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील मुलांना व मुलींना शिक्षणाची दारे खुली होणार आहेत त्यामुळे ग्रामीण भागातील मुलं मुली सुद्धा मोठ्या प्रमाणात डॉक्टर व इंजिनियर होऊन या संस्थेतून बाहेर पडणार आहेत.
तसेच ही इमारत पूर्ण झाल्यानंतर याचं उद्घाटन आजच्या दिवशी म्हणजेच २२ डिसेंबर २०२७ रोजी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते करण्यात येऊन या संस्थेचे कामकाज चालू होणार आहे.
या कार्यक्रमाला श्री.मदनराव मोहिते,श्री.आनंदराव पाटील यांची उपस्थिती होती तसेच डॉ.वेदप्रकाश मिश्रा,डॉ.प्रवीण शिंगारे , डॉ.नीलम मिश्रा, श्री.विनायकराव भोसले, श्री. पी.डी. जॉन व श्री.दिलीप पाटील यांची निमंत्रक म्हणून उपस्थिती होती. तसेच सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष उदय दादा कबुले , राजेंद्र अण्णा तांबे भाजपाचे पदाधिकारी अनुप सूर्यवंशी , प्रदिप माने आणि शिरवळ गावचे लोकनियुक्त सरपंच रविराज दुधगावकर व शिंदेवाडी गावच्या सरपंच व शिरवळ शिंदेवाडी पंचक्रोशीतील तसेच कराड परिसरातील नागरिक या कार्यक्रम प्रसंगी मोठया संख्येने उपस्थित होते.

Author: Jan Sangharsh News
जन संघर्ष न्यूज लाईव्ह