पुणे येथील खासगी रुग्णालयांकडून होणारी ; आर्थिक लूटमार थांबविण्यासाठी , पुणे महापालिकेचं महत्त्वाचं पाऊल.!!

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

जनसंघर्ष न्यूज नेटवर्क

पुणे :- पुणे तेथे काय उणे या म्हणीचा प्रत्यय खरोखर आला आहे , पुण्यात खाजगी रुग्णालयात रुग्णांकडून उपचारासाठी आवाजवी फी आकरली जाते. याच पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिका क्षेत्रातील खाजगी रुग्णालयात दरपत्रक लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच खाजगी रुग्णालयात उपचार घेण्यासाठी आलेल्या रुग्णांना दिसेल अशा ठिकाणी पुणे महानगरपालिका तक्रार निवारण कक्षाचा हेल्पलाइन क्रमांक लावणे बंधनकारण असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. हा क्रमांक सोमवार ते शुक्रवार कार्यालयीन वेळेत सुरू असेल. खाजगी रुग्णालयात होणारी आर्थिक लूटमार थांबविण्यासाठी नागरिकांनी १८००२३३४१५१ या अधिकृत टोल फ्री क्रमांकावर फोन करून आपली तक्रार नोंदवावी, असे आवाहन पुणे महानगर पालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

खाजगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या नागरिकांची मोठ्या प्रमाणात होणारी लूटमार थांबविण्यासाठी पुणे महानगरपालिकेनं महत्त्वाची पाऊलं उचललेली आहेत. पुण्यातील खाजगी रुग्णालयाला दर्शनी भागात दरपत्रक लावणे आता बंधनकारक करण्यात आले आहे.पुणे महानगरपालिकेचा आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या दोषी रुग्णालयाविरोधात कडक कारवाई केली जाईल. रुग्ण किंवा त्यांचे नातेवाईक खाजगी रुग्णालयासंबंधित तक्रार नोंदवण्यासाठी पुणे महानगरपालिकेने जारी केलेल्या १८००२३३४१५१ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करू शकतात व आपली तक्रार येथे दाखल करू शकतात.

खाजगी रुग्णालयासबंधित कोणतीही तक्रार असल्यास रुग्ण किंवा त्यांचे नातेवाईक हे टोल फ्री क्रमांकावर फोन करू शकतात. तसेच प्रत्येक व्यक्तीने हा टोल फ्री क्रमांक आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह केला पाहिजे, असेही पुणे महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Jan Sangharsh News
Author: Jan Sangharsh News

जन संघर्ष न्यूज लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें

Buzz Open / Ai Website / Ai Tool