जनसंघर्ष न्यूज नेटवर्क
इंदापूरः- इंदापूर तालुक्यातील भरणेवाडी या गावातील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्म झालेल्या आमदार दत्तात्रय मामा भरणे यांनी कारखान्याचे संचालक म्हणून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. छत्रपती सहकारी कारखान्याचे संचालक ते अध्यक्ष, पुणे जिल्हा बँकेचे संचालक ते अध्यक्ष, पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य ते अध्यक्ष, आमदार ते मंत्री असा राजकीय आलेख नेहमीच त्यांचा चढता राहिला. २०२४ मध्ये विधानसभा निवडणुकीसाठी झालेल्या अटीतटीच्या लढतीत दत्ता मामा भरणे यांनी विकासकामांच्या जोरावर संयम बाळगत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांचा सलग तिसऱ्यांदा पराभव करून केलेल्या विकासकामांच्या जिवावरती विजय संपादन केला आहे. दत्ता मामा भरणे यांनी दहा वर्षांच्या कालावधीत आमदार व मंत्री म्हणून केलेली विकासकामे यामुळे सर्वसामान्य जनता त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली.
इंदापूर तालुक्यात सर्वसामान्य जनतेशी असलेली नाळ भरणे यांनी कधीच तोडली नाही जनतेच्या सुख-दुःखात व अडीअडचणींच्या काळात त्यांनी नेहमीच मोठी भूमिका बजावली होती. राष्ट्रवादी काँग्रेसची दोन गट झाल्यानंतर आमदार दत्ता मामा भरणे यांनी अजित दादा पवारांवर विश्वास ठेवत त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची भूमिका घेतली. तसेच तालुक्यात सुमारे सहा हजार कोटींचा विकास निधी आणून सामान्य माणसाला न्याय मिळवून दिला. राष्ट्रवादी पक्ष अजित दादा गट या पक्षाशी एकनिष्ठपणा, विकासकामं व जातीय समीकरणांमुळं दत्तात्रय मामा भरणेंच्या गळ्यात कॅबिनेट मंत्रिपदाची माळ पडली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं मंत्रिपदं देताना जातीय सलोखा साधला आहे. आमदार दत्तात्रय मामा भरणे धनगर समाजाचे नेते असून, राज्यात धनगर समाजाची मोठी लोकसंख्या आहे. त्यामुळे पक्षाला मोठा फायदा होणार आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ, विकासकामे व जातीय समीकरणात दत्तात्रय मामा भरणे यांनी बाजी मारली असून, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना मोठा शह मानला जात आहे.

Author: Jan Sangharsh News
जन संघर्ष न्यूज लाईव्ह
Post Views: 164