जनसंघर्ष न्यूज नेटवर्क
बीड:- केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचा पवनचक्कीच्या गोदामात झालेल्या किरकोळ वादातून खून केल्याची घटना घडली होती. यात नवीन गोष्ट आता समोर आली आहे. पवनचक्कीच्या कंपनीकडे तब्बल २ कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी केज पोलीस ठाण्यात आज एक नवीन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कंपनीतील शिंदे नामक व्यक्तीकडून केज पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून कंपनीकडे तब्बल दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली. या प्रकरणी वाल्मीक कराड, विष्णू चाटे, सुदर्शन घुले यांनी ही खंडणी मागितल्याचा उल्लेख यामध्ये करण्यात आला आहे. याप्रकरणी केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा दाखल झाल्यामुळे बीड जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. वाल्मीक कराड हा एका राजकीय नेत्याचा निकटवर्तीय आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात आता मोठी चर्चा होत आहे.
टाकळी गावचे तरुणांनी वॉचमनला मारहाण झाल्याने सरपंच संतोष काही तरुणां सोबत तिथे गेले. टाकळी गावच्या तरुणांना तिथून हुसकावून लावले. काही उत्साही तरुणांनी टाकळी गावच्या तरुणांना मारहाण केली. त्याचा व्हिडीओ सुद्धा व्हायरल झाला. मारहाणीचा हा व्हिडीओ खऱ्या अर्थाने हत्या करणाऱ्यांच्या जिव्हारी लागला. विंड मिल वर आलेला ग्रुप खंडणी मागायला आला होता, असे मस्साजोग च्या ऑफिस बॉयने सांगितले आहे.
सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण हत्येमागे विंड मिलचा प्रकल्प प्रमुख कारण समोर आलं आहे. गाव शिवारातील पवन चक्की कार्यालयातील गावच्या वॉचमनला मारहाण झाली म्हणून सरपंच सोडवायला गेले आणि त्यानंतर त्यांचे अपहरण झाले आणि त्यांची हत्या करण्यात आली. सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण आणि हत्येचे कारण तिथे आलेला विंड मिलचा प्रकल्प आहे. या प्रकल्पासाठी संतोष यांनी जागा मिळवून दिल. एवढचं आपल्या गावातील काही तरुणांना तिथे कामाला लावले. अवाणा विंड मिल कंपनीला मदत करण्याची जबाबदारी सरपंच संतोष देशमुख यांची होती. मस्साजोगपासून जवळ असलेल्या टाकळी गावाची काही तरुण विंड मिलच्या ऑफिसला आले. त्यांनी मस्साजोग गावाच्या अशोक सोनवणे नावाच्या वॉचमनला मारहाण केली.
मस्साजोग शिवारात आलेली आवाना विंड मिलच्या अडीअडचणी सोडवण्याची जबाबदारी ही मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची होती. त्याच कंपनीच्या साईटवर टाकळीची मंडळी खंडणी मागायला आली आणि मस्साजोग च्या वॉचमनला मारहाण केली.मारहाण करणाऱ्यांना मस्साजोगच्या तरुणांनी मारहाण केली आणि पुढील दुर्दैवी घटना झाली. मारहाण झालेल्या तरुणांना बदला घ्यायचा म्हणून सरपंच संतोष यांचे अपहरण करण्यात आलं व त्यांची क्रुरपणे हत्या करण्यात आली आहे.
या झालेल्या घटनेमुळे महाराष्ट्राची वाटचाल हि बिहारच्या दिशेनं चालू झाली आहे का? असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे . असे गुन्हे घडूच नयेत म्हणून गृह खात्याकडून कडक अशा उपायोजना होऊन असे गुन्हे पुन्हा होऊच नयेत म्हणून ठोस असे निर्णय घेण्यात यावेत ऐवढीचं माफक अपेक्षा आता सर्व सामान्य जनतेकडून या नवीन आलेल्या सरकारकडून आहे.

Author: Jan Sangharsh News
जन संघर्ष न्यूज लाईव्ह