जनसंघर्ष न्यूज नेटवर्क
इंदापूर :- शरदचंद्रजी गोविंदराव पवार (१२ डिसेंबर १९४०) हे एक भारतीय राजकारणी आहेत. ते चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. तसेच पी.व्ही. नरसिंह राव यांच्या मंत्रिमंडळात संरक्षण मंत्री म्हणून आणि मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळात कृषी मंत्री म्हणून त्यांनी काम केले आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसपासून वेगळे झाल्यानंतर १९९९ मध्ये त्यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते माजी अध्यक्ष, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार गट पक्षाचे विद्यमान अध्यक्ष आहेत. ते भारतीय संसदेच्या वरिष्ठ सभागृह असलेल्या राज्यसभेत राष्ट्रवादी काँग्रेस शिष्टमंडळाचे नेतृत्व करतात. तसेच ते महाविकास आघाडी या प्रादेशिक राजकीय आघाडीचे अध्यक्ष आहेत. असा त्यांचा जीवन प्रवास आसून आज त्यांचा दि.१२ डिसेंबर रोजी ८५ वा वाढदिवस संपूर्ण राज्यामध्ये वेगवेगळ्या उपक्रमांद्वारे साजरा करण्यात आला.
आजच्या दिवसाचे औचित्य साधून इंदापूर तालुक्यातील म्हसोबाचीवाडी या गावातील युवकांनी शरदचंद्र पवार यांचा ८५ वा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला आहे प्राथमिक शाळा म्हसोबाचीवाडी येथे पद्मविभूषण खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊवाटप करण्यात आले या कार्यक्रमप्रसंगी विकास सोसायटी म्हसोबाचीवाडी चेअरमन अनिकेत झेंडे (पाटील )तंटामुक्त समितीचे अध्यक्ष लालासो साळुंखे तसेच माजी उपसरपंच निलेश पवार तसेच माजी उपसरपंच दादासो पवार , सामाजिक कार्यकर्ते विकास चांदगुडे , अथर्व किराणा दुकान मालक सचिन पवार , सामाजिक युवा कार्यकर्ते सचिन चांदगुडे , चीटबाय राहुल चांदगुडे , पृथ्वीराज चांदगुडे , प्रतीक मराळ ,दीपक चांदगुडे सुहास पवार आदी मान्यवर आणि शाळेचा संपूर्ण शिक्षक वर्ग या कार्यक्रम प्रसंगी उपस्थित होते.

Author: Jan Sangharsh News
जन संघर्ष न्यूज लाईव्ह