भिगवण गॅस एजन्सीकडून गॅसचा काळाबाजार ; खबर मुंबईच्या पत्रकाराला, गुन्हा दाखल झाला भिगवण पोलीस ठाण्यात.!!

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

जनसंघर्ष न्यूज नेटवर्क

  इंदापूर :- भिगवण येथील अंजली इंडियन गॅस एजन्सी या घरगुती व व्यापारी गॅस सिलेंडर वितरण एजन्सीचे कामगार हे भरलेल्या गॅस टाकीतून तीन ते चार किलो गॅस काढून टाकी पुन्हा सीलबंद करायचे आणि ती अपूर्ण गॅस टाकी ग्राहकांना विकायचे; गेल्या अनेक महिन्यांपासून हा गॅसचा काळाबाजार सुरू असावा! ते इथं कुणालाच कळलं नाही का ? पण मुंबईतील एक महिला पत्रकार यांना मात्र याची माहिती मिळाली आणि पोलिसांना या कामगारांवर गुन्हा दाखल करावा लागला.

घडलेल्या गुन्ह्या नुसार अंजली इंडेनगॅस एजन्सी असे या एजन्सी चे नाव असून 29 नोव्हेंबर रोजी हा प्रकार घडला. मुंबईतील पत्रकार रिता यादव यांच्या फिर्यादीवरून भिगवण पोलिसांनी अशोक भवरलाल सिया व मुकेश कुंवर लाल बिष्णोई या मूळ राजस्थान मधील व सध्या भिगवण हद्दीतील मदनवाडी येथे राहत असलेल्या दोन कर्मचाऱ्यांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

अर्थात या अंजली एजन्सीच्या गोडाऊन मध्ये काम करत असलेल्या दोन कामगारांवर फक्त गुन्हा दाखल झाला, परराज्यातील कामगारांना मालकाच्या परस्पर अशा पद्धतीचे बेकायदेशीर काम करण्याची डेअरिंग कसे होईल? हा खरे तर इथल्या साऱ्यांनाच प्रश्न पडला आहे. पण तो प्रश्न भिगवण पोलिसांपुढे नाही. त्यामुळे त्यांनी वितरक आणि तिच्या व्यवस्थापकावर मात्र गुन्हा दाखल केला नाही. त्याची मोठी चर्चा सध्या परिसरात सुरू आहे. वितरकाला वगळण्यामध्ये नेमका काय हित संबंधाचा भाग होता? याची देखील कुजबूज सुरू आहे.

भिगवण पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या फिर्यादीनुसार या दोघांनी संगनमत करून बेकायदेशीरपणे महिंदा बोलेरो पिकअप (क्र. एमएच १२ एफडी १५९२), महिंद्रा बोलेरो पिकअप (क्र एमएच ४२ बीएफ ३४५८) तसेच महिंद्रा बोलेरो पिकअप (एमएच ४२ बीआय ३४५९), अशा तीन वाहनांमधील ४७ भरलेल्या सिलेंडर मधून लोखंडी पाईपच्या साह्याने मोकळ्या सिलेंडर मध्ये काही गॅस भरताना पोलिसांनी पकडले. पोलिसांच्या कारवाईत ४७ गॅस सिलेंडर, तीन महिंद्रा पिकअप, गॅस ट्रान्स्फर करायच्या नळ्या असा ७ लाख ११ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या गुन्ह्याचा अधिकचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली भिगवण पोलीस करत आहेत.

Jan Sangharsh News
Author: Jan Sangharsh News

जन संघर्ष न्यूज लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें

Buzz4 Ai