महायुतीच्या संभाव्य मंत्र्यांची यादी आली समोर ; कोण-कोण घेणार मंत्रिपदाची शपथ?

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

जनसंघर्ष न्यूज नेटवर्क

मुंबई :-राज्यातील झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये महायुतीला अभुतपूर्व आसं यश मिळाल्यानंतर, राज्यात नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. येत्या ५ डिसेंबरला राज्यातील नव्या महायुती सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार असून मात्र मुख्यमंत्रिपदाची शपथ कोण घेणार, याची उत्सुकता अवघ्या महाराष्ट्रासह संपूर्ण देशाला लागली आहे.तसेच यावेळी कुणाला लॉटरी लागणार आणि कुणाचा पत्ता कट होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.अशातच महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या भाजप, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट या तिन्ही पक्षांच्या संभाव्य मंत्र्यांची यादी आता समोर आली आहे.

शिवसेना आणि राष्ट्रवादीचे संभाव्य मंत्री पुढीलप्रमाणे

शिवसेनेकडून एकनाथ शिंदे, उदय सामंत, तानाजी सावंत, दीपक केसरकर आणि शंभुराजे देसाई हे मंत्रीपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. तर राष्ट्रवादीकडून अजित पवार, अदिती तटकरे, अनिल पाटील, धनंजय मुंडे आणि दिलीप वळसे पाटील शपथ घेणार आहेत. अजित पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी कॉग्रेसने देखील जोरदार मुसंडी मारली आहे.

भाजपच्या संभाव्य मंत्र्यांची नावं

पश्चिम महाराष्ट्र

शिवेंद्रसिंहराजे भोसले
गोपीचंद पडळकर
माधुरी मिसाळ
राधाकृष्ण विखे पाटील
राहुल कुल

कोकण विभाग

रविंद्र चव्हाण
नितेश राणे
गणेश नाईक

मुंबई

मंगलप्रभात लोढा
आशिष शेलार
अतुल भातखळकर

विदर्भ

चंद्रशेखर बावनकुळे
सुधीर मुनगंनटीवार
संजय कुटे

सर्वाधिक १३२ जागा जिंकणाऱ्या भाजप पक्षाकडे मुख्यमंत्रिपद राहणार आहे, हे आता निश्चित झालं आहे. भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांच नाव आघाडीवर असल्याचं सांगण्यात येत असलं तरी, जोपर्यंत नाव जाहीर होत नाही, तोपर्यंत भाजप कोणतं धक्कातंत्र अवलंबणार का, असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित करण्यात येत आहे.

Jan Sangharsh News
Author: Jan Sangharsh News

जन संघर्ष न्यूज लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें

Buzz Open / Ai Website / Ai Tool