आई-वडील ऑफिसला जाताच , नराधम आजोबाचं ; नातीसोबत पाशवी कृत्य.!!

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

जनसंघर्ष न्यूज नेटवर्क

 मुंबई :- महाराष्ट्र राज्यात मुली तसेच महिलांवरील अत्याचाराच्या घटना ह्या दिवसेंदिवस वाढतच असून कधी बाहेरचे तर कधी घरातली लोकचं हे हैवानी कृत्य करताना आता समोर येत आहेत. अशातच मुंबईत आता पुन्हा अशीच एक भयानक घटना घडली असून आजोबांनीच त्यांच्या नातीवर अत्याचा केल्याचे उघड झाले आहे.अवघ्या १३ वर्षांच्या नातीला वासनेची शिकार करत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी नराधम आजोबाला पवई अटक करण्यात आली आहे.

त्याच्या विरोधात बलात्कार आणि पॉक्सो चा गुन्हा दाखल करत अवघ्या काही तासांतच त्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. मात्र यामुळे शहरात मोठी खळबळ माजली असून मुली-महिला सुरक्षित कधी जगू शकणार, असा प्रश्न नागरिकांकडून विचारण्यात येत आहे.

आई-वडील कामावर जाताच आजोबा साधायचा संधी

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी अवघी १३ वर्षांची असून ती आई-वडिलांसह पवई येथे राहते. तिच्या चुलत आजोबांनीच तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. गेल्या महिन्याभरापासून हा घृणास्पद प्रकार सुरू होता. पीडित मुलीचे आई-वडील हे कामावर गेल्यावर तो नराधम इसम संधी साधायचा आणि त्या मुलीवर अत्याचार करायचा. तसेच या घटनेबाबत कोणालाही सांगितलं तर जीवानिशी मारेन अशी धमकीही त्याने पीडित मुलीला दिली होती. त्यामुळे ती निमुटपणे हा अत्याचार सहन करत होती.

मात्र काही दिवसांनी त्रास होऊ लागल्याने तिने कशीबशी हिंमत गोळा करत घडलेल्या प्रकाराबाबत तिच्या आईला सांगितलं. नराधम नातेवाईकाचं हे कृत्य आणि मुलीला काय काय सोसाव लागलं हे ऐकून त्या मातेच्या पायाखालची जमीनच सरकली. घरच्यांना सर्व प्रकार सांगितल्यावर तेही हादरले. मात्र घडलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आणि नराधमाला शिक्षा झालीच पाहिजे या हेतूने त्यांनी पोलिसांत धाव घेतील. पवई पोलिसांत तक्रार दाखल केल्यावर त्या नराधमा विरोधात बलात्कार आणि पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला. काही तासांतच आरोपीचा शोध घेऊन त्याला बेड्या ठोकल्या, याप्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

Jan Sangharsh News
Author: Jan Sangharsh News

जन संघर्ष न्यूज लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें

Buzz Open / Ai Website / Ai Tool