जनसंघर्ष न्यूज नेटवर्क
सातारा :- राज्यात विधानसभेच्या निवडणूका झाल्या त्यानंतर विधानसभेचे निकाल लागून पुर्ण भउमतानं महायुतीला यश मिळालं व त्यानंतर उदया होणाऱ्या शपथविधीसाठी जोरदार तयारी सुरू आसतानाच साताऱ्यातून एका धक्कादायक बातमी समोर आली आहे.
राज्याच्या मंत्रिमंडळात शिवेंद्रसिंहराजे आणि केंद्राच्या मंत्रिमंडळात उदयनराजे भोसले यांना कॅबिनेट मंत्री करा, या मागणीसाठी राजूर-टेंभुर्णी महामार्गाजवळ असलेल्या मोबाइल टॉवरवर चढून एका पोलीस कर्मचाऱ्याने शोले स्टाईल आंदोलन सुरू केले आहे.
सदाशिव ढाकणे असं या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. पुढील २ तासात अमित शाह किंवा देवेंद्र फडणवीस हे शिवेंद्रसिंहराजे आणि उदयनराजे भोसले यांना कॅबिनेट मंत्री करण्याचं आश्वासन देत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याची भूमिका या पोलीस कर्मचाऱ्याने घेतली आहे. घटनेची माहिती मिळताच हसनाबाद पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून या पोलीस कर्मचाऱ्याला खाली उतरवण्यासाठी त्याची मनधरणी करण्यापर्यंत पोलिसांचे प्रयत्न सुरू आहे. गावातील नागरिक ही घटनास्थळी दाखल झाले आहेत. त्या ठिकाणी बघ्यांची गर्दी जमा झाली आहे.उदयनराजे भोसले यांनी पोलीस कर्मचाऱ्याशी फोनवरुन संपर्क केला आणि त्याला खाली उतरण्याची विनंती केली आहे.

Author: Jan Sangharsh News
जन संघर्ष न्यूज लाईव्ह